‘मोहित कंबोजची हॉटेल चालवण्यासाठी समीर वानखेडे शेजारच्या हॉटेलवर कारवाई करायचे’


हायलाइट्स:

  • नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद
  • मोहित कंबोजवर केले धक्कादायक आरोप
  • समीर वानखेडे यांच्यावरही साधला निशाणा

मुंबईः ‘मुंबईत मोहित कंबोज (Mohit kamboj) यांच्या मालकीची १२ हॉटेल्स आहेत. कंबोज स्वतःच्या हॉटेल्सच्या आसपास असणारी इतर हॉटेल्स बंद पाडण्यासाठी त्यांच्या मालकांना समीर वानखेडे (sameer wankhede) खोट्या गुन्ह्यात अडकवतात,’ असा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मुंबई ड्रग्ज क्रुझ प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. तसंच, मोहित कंबोज हे क्रुझ पार्टी प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, मोहित कंबोज व समीर वानखेडे यांच्यात चांगले संबंध असल्याचंही मलिकांनी म्हटलं आहे.

‘मुंबईत मोबित कंबोजच्या मालकीची १२ हॉटेल्स आहेत. कुणाल जानीच्या मालकीचे बास्कीन हे हॉटेल आहे. उच्चभ्रू वर्गात हे हॉटेल लोकप्रिय आहे. मात्र, मोहित कंबोजने याच परिसरात ओपा हॉटेल सुरू केले. बास्किन हॉटेल बंद पाडण्यासाठी मोहित कंबोजने समीर वानखेडे यांच्या माध्यमातून कुणाल जानीला खोट्या प्रकरणात अडकवले. जेणेकरुन कुणाल जानी बास्किन हॉटेल बंद करतील,’ असा मोहित कंबोज यांचा प्रयत्न असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

‘मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांच्यातील संबंध चांगले आहेत. वानखेडे आणि कंबोज हे ७ तारखेला ओशिवराच्या कब्रस्तानाच्या बाहेर भेटले. त्यांचं नशीब चांगलं होतं की पोलीसांचे सीसीटीव्ही बंद होतं. त्यामुळे व्हिडीओ मिळाला नाही. त्यानंतर वानखेडे घाबरून गेले आणि त्यांनी कोणी तरी पाठलाग करत असल्याची तक्रार केली, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

‘शहरात ड्रग्जच्या नावावर निरपराध लोकांना घाबरवलं जात आहे. हजारो कोटींची वसुली होत आहे याच्या विरोधात मी लढतोय. गेल्या महिन्याभरापासून ही बातमी चर्चेत आहे. एनसीबीच्या महासंचालकांनी वक्तव्य केलं होतं की, पहिल्यांदाच समुद्रात कारवाई झाली. पण खरंतर असं काहीच नव्हतं. पब्लिसिटीचा स्टंट होता हा, लोकांना टार्गेट केलं गेलं. आर्यनचं अपहरण केलं आणि खंडणीची मागणी केली गेली,’ असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: