BJP’s National Executive Committee : भाजपच्या कार्यकारिणीची बैठक सुरू; PM मोदी, अमित शहांसह नड्डा दाखल


नवी दिल्लीः भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील एनडीएमसी कनव्हेन्शन सेंटरमध्ये दाखल झाले आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डाही त्यांच्यासोबत पोहोचले आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांच्या भाजपचे सर्व केंद्रीय मंत्री आणि प्रमुख नेते दाखल झाले आहेत.

या बैठकीत पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या सात वर्षातील कामगिरीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर सभेच्या ठिकाणी एक प्रदर्शन आयोजित केले जात आहे. कोविड-व्यवस्थापन, विक्रमी लसीकरण आणि जागतिक मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्याचेही नियोजन आहे.

या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे भाषण होईल. दुपारी ३ वाजता पंतप्रधान मोदींच्या भाषणाने बैठक संपेल. कोविडशी संबंधित नियम लक्षात घेऊन एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कार्यकारिणीचे १२४ सदस्य उपस्थित राहतील. यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रीय अध्यक्षांसह सर्व केंद्रीय मंत्री, पक्षाचे राज्यसभेतील नेते पियुष गोयल आणि कार्यसमितीचे इतर सदस्य यांचा समावेश आहे.

३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखालील राज्य युनिट डिजिटल माध्यमातून कार्यकारिणीच्या बैठकीत सामील होतील. या बैठकीत राजकीय ठरावही मंजूर केला जाणार आहे. तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर विशेष चर्चा आणि विचारमंथन होणार आहे.

करोना काळात ज्या नेत्यांचे अकाली निधन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. तसंच एक शोक प्रस्तावही मंजूर केला जाईल. कार्यकारिणीच्या बैठकीत एक प्रदर्शनही भरवण्यात येईल. ज्यात स्वावलंबी भारतासंबंधी पतंप्रधान मोदींनी केलेल संकल्प, गरिब कल्याण योजना आणि सामान्यांना मिळत असलेली मदत, महिलांच्या बँक खात्यात जमा होत असलेले पैसे तसंच समाजातील इतर वर्गांसाठी केल्या जात असलेल्या कार्यांना उल्लेख असेल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: