Semis : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत दाखल, दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली अपयशी…


शारजा : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आजचा सामना सर्वांसाठी महत्वाचा होता. कारण आजच्या सामन्यातून नेमके कोणते संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणार, हे ठरणार होते. दक्षिण आफ्रिकेने जर आजच्या सामन्यात इंग्लंडला १३१ धावांमध्ये रोखले असते तर त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता आले असते आणि ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीमधून बाद झाला असता. पण आजच्या सामन्याच दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडला १३१ धावांमध्ये रोखता आले नाही आणि त्यांचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंग पावले. त्यामुळे आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.

इंग्लंडने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारली. पण इंग्लंडचा हा निर्णय योग्य नसल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दाखवून दिले. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांना १५ धावांवर पहिला धक्का बसला. पण त्यानंतर क्विंटन डीकॉक आणि रॅसी व्हॅन डर दुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली आणि संघाची गाडी रुळावर आणली. डीकॉकला आदिल रशिदने बाद करत ही जोडी फोडली, त्याने चार चौकारांच्या जोरावर २७ चेंडूंत ३४ धावा केल्या. डीकॉक बाद झाला, पण त्यानंतर दुसेन आणि अॅडम मार्करम यांची जोडी चांगलीच जमली. या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची अभेद्य भागीदारी रचली. दुसेनने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत ६० चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ९४ धावांची दणदणीत खेळी साकारली, दुसेनला यावेळी मार्करमची सुयोग्य साथ मिळाली. मार्करमने यावेळी २५ चेंडूंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोराव नाबाद ५२ धावांची खेळी साकारली. दुसेन आणि मार्करम यांच्या धमाकेदार फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडपुढे १९० धावांचे आव्हान ठेवता आले. इंग्लंडला यावेळी १३२ धावा केल्या आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: