जिल्ह्या रुग्णालयात अग्नितांडव, १० जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?


नगर : सकाळी साडेदहाच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या icu ला भीषण आग लागली. या ठिकाणी १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत असून साधारण: २० ते २५ जण उपचार घेत होते. भीषण आग लागल्याने परिस्थिती तनाव जनक निर्माण झाली. काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्या त्याठिकाणी दाखल झाल्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन या icu विभागात धाव घेतली.

तातडीने रुग्णांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. संपूर्ण icu जळून खाक झाले. या भीषण अग्रितांडवात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे सर्व रुग्ण वयोवृद्ध आणि व्हेंटिलेटरवर होते. आग लागल्यानंतर त्यांना शिफ्ट करत असताना त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेंद्र भोसले, कॅम्प पोलीस स्टेशनचे शिशिरकुमार देशमुख हे घटनास्थळी दाखल आहेत.

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग लागलेल्या आगीची माहिती वरिष्ठांना दिलेली आहे. सर्व घटनेची सखोल चौकशी करणार आहोत. अतिदक्षता विभागात असलेल्या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांशी या घटनेच्या अनुषंगाने चौकशी करून त्यांचे सर्व म्हणणे ऐकून या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व दोषींवर कारवाई करू, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.
Big Breaking : नगरमध्ये रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग, १० रुग्णांचा मृत्यू
जिल्हाधिकारी भोसले यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाला भेट देऊन पाहणी केली यावेळी आमदार संग्राम जगताप पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे हे बरोबर होते.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, घटना खूप गंभीर आहे. वरिष्ठांना घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. आगीत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत दिली जाईल. घटनेच्या चौकशीसाठी मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडे चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई करू. घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. त्याला खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. याची दक्षता विभागाचे फायर ऑडिट झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
Video : आजपासून राज ठाकरे राहणार नव्या घरात, पहा कसं आहे नवं ‘शिवतीर्थ’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: