हेल्मेटसह अपघाती विमा संरक्षण; आयसीआयसीआय लोम्बार्डचा वेगा हेल्मेटशी केला करार


हायलाइट्स:

  • करोना रोखण्यासाठी लागू झालेलं लॉकडाउन शिथिल होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
  • विमा उतरविलेली व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबासाठी अपघातासारख्या आणीबाणीच्या घटनेतसुध्दा आर्थिक सुरक्षा प्रदान करते.
  • वैयक्तिक मोबिलिटीची मागणी अनेक पटींनी वाढली आहे.

मुंबई : दुचाकीस्वारांची वाढलेली संख्या आणि भारतातील रस्ते अपघाताची भयानक आकडेवारी पाहता, सुरक्षा धोक्यात वाढ होण्याचे संकेत आत्ताच मिळत आहेत. ही वाढती जोखीम लक्षात घेऊन, रस्ता सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी आणि संरक्षणाची वाहनचालकांना सवय लावण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने वेगा हेल्मेटच्या प्रत्येक ऑनलाइन खरेदीवर वैयक्तिक अपघाती पॉलिसी प्रदान करण्यासाठी सहकार्य करार केला आहे.

मुकेश अंबानींचे लंडनमध्ये घर; रिलायन्स समूहाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण म्हणाले…
करोना रोखण्यासाठी लागू झालेलं लॉकडाउन शिथिल होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. एका अहवालानुसार, सार्वजनिक वाहतूक वापरण्याची इच्छा आता जगात शहरी भारतीयांमध्ये सर्वात घसरणीवर आलेली आहे, जवळपास निम्म्ये म्हणजे ४९ टक्के भारतीय भविष्यात सार्वजनिक वाहतूक अतिशय अल्प प्रमाणात वापरतील, असे आढळून आले आहे. वैयक्तिक मोबिलिटीची मागणी अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये दुचाकी खरेदीस आणखी प्रोत्साहन मिळेल, असा अंदाज आहे.

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त; २२ राज्य व केंद्रशासित प्रदेशांची दर कपात, महाराष्ट्राकडे लक्ष
हेल्मेट आणि वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाद्वारे ग्राहकांना दुहेरी संरक्षण देणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देताना एक लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेसह अपघाती मृत्यूचा लाभसुध्दा प्रदान करते आणि हे विमा कवच जगभरात लागू आहे. नवीन कराराबद्दल बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्डचे कार्यकारी संचालक संजीव मंत्री म्हणाले की, आजच्या अस्थिर जगात विमा कवचाला पुर्वीपेक्षा अधिक महत्व प्रदान झाले आहे. वैयक्तिक अपघाती विमा कवच हीच बाब अधोरेखित करते. विमा उतरविलेली व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबासाठी
अपघातासारख्या आणीबाणीच्या घटनेतसुध्दा आर्थिक सुरक्षा प्रदान करते.

क्रिप्टो करन्सी झाले स्वस्त ; जाणून घ्या आज कोणकोणत्या चलनांमध्ये झाली घसरण
व्हेगा हेल्मेटचे व्यवस्थापकीय संचालक गिरधारी चांडक म्हणाले की, गेली तीन दशके आम्ही सुरक्षा आणि दर्जा पुरविण्यात अग्रेसर असून देशातील कोट्यवधी दुचाकीस्वारांची व्हेगालाच पसंती आहे. आयसीआयसीआय लोम्बार्डबरोबरील भागीदारीमुळे आम्ही आंनदीत असून दुचाकीस्वाराला शाररीक आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा कवच देणे आम्हाला शक्य झाले असून त्यांना व्यापक आणि सर्वसमावेषक सुरक्षा प्रदान करत आहोत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: