भारतीय संघ आणि खेळाडूंसाठी स्पेशल सामना; पाहा आज काय होणार


अबुधाबी: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये आज शुक्रवारी भारतीय संघ स्कॉटलंडविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची आहे. भारतीय संघाला या सामन्यात मोठा विजय मिळवावा लागले. ही लढत दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातपासून सुरू होणार आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत भारतीय खेळाडू जेव्हा मैदानात उतरतील तेव्हा त्याच्याकडे खास विक्रम करण्याची संधी असेल.

रोहित शर्मा: उपकर्णधार रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३ हजार धावा करण्यासाठी ४८ धावांची गरज आहे. आज त्याने ४८ धावा केल्यास अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरेल. त्याच बरोबर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलला मागे टाकले. गप्टिलने ३ हजार ६९ धावा केल्या आहेत. रोहितने आतापर्यंत २ हजार ९५२ धावा केल्या आहेत.

केएल राहुल: सलामीवीर राहुलने आज ४४ धावा केल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याबाबत तो झिम्बाब्वेचा हॅमिल्टन मसाकाद्जा, आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, पाकिस्तानचा उमर अकमल यांना मागे टाकले. राहुलने टी-२० मध्ये आतापर्यंत १ हजार ६४७ धावा केल्या आहेत.

विराट कोहली: विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३ हजार २२५ धावा केल्या आहेत. आज त्याने ७५ धावा केल्यास त्याच्या ३ हजार ३०० धावा होतील. याच बरोबर टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो श्रीलंकेचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान याला मागे टाकेल. दिलशानने ८९७ धावा केल्या आहेत. तर विराटने आतापर्यंत ८४३ धावा केल्या आहेत.

ऋषभ पंत: भारताचा विकेटकीपर पंतने आतापर्यंत ३६ सामन्यातील ३२ डावात २२.७च्या सरासरीने ५९० धावा केल्या आहेत. जर आज त्याने २० धावा केल्यास तो मनीष पांडेला मागे टाकू शकतो

जसप्रीत बुमराह: भारतीय गोलंदाज बुमराहने आज दोन विकेट घेतल्यास टी-२० मध्ये देशाकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. याच बरोबर तो युजवेंद्र चहल (६३ विकेट) आणि इमरान ताहिर यांना मागे टाकेल. बुमराह प्रमाणे आर अश्विनने आज चार विकेट घेतल्यास तो टी-२० मध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत सोहेल तनवीर आणि वॅन डेर मेर्वे यांना मागे टाकेल. भारताचा ऑल राउंडर रविंद्र जडेजाने एक विकेट मिळवताच तो पॅट कमिन्स एरिक इवानो या गोलंदाजांना मागे टाकले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: