धक्कादायक! दिवाळीली माहेरी न पाठवल्याने पत्नीची आत्महत्या, धक्क्याने पतीनेही संपवले जीवन


हायलाइट्स:

  • दिवाळीनिमित्त माहेर न पाठवल्यामुळे रागावलेल्या पत्नीची आत्महत्या.
  • आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने पतीचीही आत्महत्या.
  • कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे या धक्कादायक घटना घडल्या.

हिंगोली: दिवाळीला जाण्यासाठी पतीने विरोध केल्यानंतर पत्नीने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नी आपल्याला सोडून गेल्याने हादरून गेलेल्या पतीने देखील दुसऱ्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला घटना घडल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे घडलीय. (wife ends her life for not sending to her mother home for diwali husband also ends life due to shock)

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे; मात्र, वानखेडेही असतील टीमचा भाग

काजल सोनू उर्फ भीमराव घोगरे(२०) सोनू उर्फ भीमराव रामा घोगरे (२२) अशी मयताची नावे आहेत. काजल आणि सोनू चे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. ते नेहमीच एकाच ताटामध्ये जेवण करत असत. दोघे अजिबात एकमेकाला सोडून राहत नसत. परंतु. दिवाळी सणानिमित्त माहेरी जाण्यासाठी पत्नीला पतीने विरोध केल्यानंतर पत्नीला राग सहन झाला नाही तिने थेट घरातच छताला गळफास लावून आत्महत्या केली.

क्लिक करा आणि वाचा- Breaking News! समीर वानखेडेंकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेतला

या घटनेने पती सोनू उर्फ भीमराव हा चांगलाच हादरून गेला, अन त्याने देखील शेतशिवारात आत्महत्या केली. त्याने आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले. दोघांनीही आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.

दरम्यान, या प्रकरणाची अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

क्लिक करा आणि वाचा- ‘नारायण राणे यांनी बाळासाहेब, सोनिया गांधी, पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: