धमाकेदार विजयानंतर भारतीय संघाला मिळाली मोठी गूड न्यूज, रनरेटसह उपांत्य फेरीची शक्यताही वाढली…


दुबई : भारताने स्कॉटलंडविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात दणदणीत विजय साकारला. या मोठ्या विजयाचा चांगलाच फायदा आता भारतीय संघाला झालेला पाहायला मिळत आहे.

भारतीय संघाला या विजयाचा कसा फायदा झाला, पाहा….
भारतीय संघाला विश्वचषकात दोन पराभव पत्करावे लागले आणि त्याचा रनरेट मायनसमध्ये गेला होता. पण भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ६६ धावांनी विजय साकारला आणि भारताचा रनरेट + ०.०७३ एवढा झाला होता. भारताने स्कॉटलंडच्या सामन्यात तर दमदार देदिप्यमान कामगिरी केली. कारण भारताने फक्त ८५ धावांमध्ये स्कॉटलंडच्या संघाला ऑलआऊट केले. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी १२ षटकांचे टार्गेट भारतीय संघाला देण्यात आले होते. पण भारतीय संघाने हे आव्हान फक्त सातव्या षटकातच पूर्ण केले आणि सर्वांनाच जोरदार धक्का दिला. भारताला या सामन्यात मोठा विजय मिळवल्याचा फायदा नक्कीच झाला आहे. कारण भारताचा रनरेट आता ०.०७३ वरून थेट +१.६१९ एवढा चांगलाच वाढलेला पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने गुणतालिकेत आता चार गुण पटकावले आहेत. भारतीय संघाचा हा विश्वचषकातील दुसरा विजय होता, त्यामुळे त्यांचे चार गुण झाले आहेत. भारतासाठी हा विजय फार महत्वाचा ठरणार आहे. कारण न्यूझीलंडला स्कॉटलंडवर फक्त १६ धावांनी विजय मिळवता आला होता, पण दुसरीकडे भारताने मात्र त्यांना ८५ धावांमध्ये गुंडाळले आणि हे आव्हान सात षटकांमध्येच पूर्ण केले. त्यामध्ये स्कॉटलंडविरुद्ध न्यूझीलंडपेक्षा भारतच सरस ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. भारताचा आता विश्वचषकात एकमेव सामना उरला आहे. भारताचा हा सामना नामिबीयाबरोबर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ किती मोठा विजय मिळवतो आणि रनरेटमध्ये किती वाढ होते, हे पाहणे सर्वांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर आता सर्वांच्या नजरा या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावर असतील. कारम या सामन्यात जर न्यूझीलंडला धक्का बसला तर भारतीय संघासाठी उपांत्य फेरीचे दार उघडणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना महत्वाचा असेल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: