rane vs raut:’नारायण राणे यांनी बाळासाहेब, सोनिया गांधी, पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला’


हायलाइट्स:

  • विनायक राऊत यांची नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र.
  • नारायण राणे हे पाठीत खंजीर खुपसणारे नेते- विनायक राऊत.
  • राणे यांनी बाळासाहेब, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला- राऊत.

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राऊत यांनी राणे यांचा उल्लेख खंजीर खुपसणारा नेता असा केला आहे. या देशात खंजीर खुपसणारा नेता म्हणजे नारायण राणे हे आहेत. राणे यांनी त्यांच्यावर ज्यांनी उपकार केले त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. तसेच त्यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्याही पाठीत खंजीर खुपसला आणि हे इतरांना शहाणपण शिकवायला निघालेत आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी राणे यांच्यावर टीकेचे प्रहार केले आहेत. (MP Vinayak Raut has accused Narayan Rane of betraying Balasaheb Thackeray, Sonia Gandhi and Sharad Pawar)

राज्याच्या राजकारणात नारायण राणे यांनीच खंजीर खुपसण्याचा इतिहास निर्माण केला आहे, म्हणूनच त्यांनी इतरांवर बोलूच नये असे राऊत यांनी म्हटले आहे. राणे यांच्यावर टीका करताना राऊत यांनी राणेंचा उल्लेख गटारीचा महामेरू असाही केला. राणे हे गटारीचे महामेरू आहेत. जर कोणी सर्व पक्षांशी गद्दारी केली असेल तर ती नारायण राणे यांनीच केलेली आहे. राणे हे शिवसेनेशी गद्दारी करूनच काँग्रेसमध्ये गेले, अशी टीकाही राऊत यांनी राणे यांच्यावर केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’; सोमय्यांचा गंभीर आरोप

राणेंनी मोदी आणि शहांवरही केली होती खालच्या भाषेत टीका- राऊत

राणे यांच्यावर हल्लाबोल करताना राऊत म्हणाले की नारायण राणे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खालच्या भाषेत उल्लेख केला होता. राणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्यावरही टीका केले होती. राणेंनी विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या इतिहासाचे वाचन देखील केले होते असे सांगतानाच राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या किती कुंडल्या बाहेर काढल्या?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राणे आता भाजपमध्ये गेल्यावर त्यांनी स्वत:ला शुद्ध विचारवंत म्हणून समजू नये, असा टोलाही राऊत यांनी राणे यांना लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘दिवाळीनंतर बॉम्ब’, या वक्तव्यावरून रोहित पवारांचा फडणवीस यांना जोरदार टोला

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शरद पवार यांच्याशी व्यक्तिगत नव्हे, कर राजकीय वैर होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी बारामतीच्या विकासाबद्दल नेहमीत कौतुक केलेले आहे. मुख्यमंत्र्यांनीही तेच केलेले आहे, असे सांगत त्यांनी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. जर नारायण राणे यांनी सिल्वासामध्ये जाऊन दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीसाठी प्रचार केला असता तर कलाबेन डेलकर यांना आणखी जास्त मते मिळाली असती. शिवाय, त्यांच्या उमेदवाराला किती मते मिळाली असती हे देखील स्पष्ट झाले असते, असेही राऊत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढू नका, अन्यथा…’; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ते चिपी विमानतळाची जमीन हडप करायला निघाले होते- राऊत

चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना राणे यांचे कान टोचले होते आणि ती वेळ नारायण राणे यांनीच आणली. चिपी विमानतळाची जमीन ते हडप करायला निघाले होते आणि त्याचा भांडाफोडच शिवसेनेने केला आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: