क्रिकेटपटू पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; टीव्ही स्टारला पाठवला अश्लील…नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ऑस्ट्रेलियन रिअॅलिटी टीव्ही स्टार जेसिका पॉवरने त्याच्यावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे. तिने वॉर्नला ‘विक्षिप्त’ म्हटले आहे. शेन वॉर्नच्या वागणुकीबद्दल एखाद्या महिलेने तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वॉर्न आपल्या वर्तणुकीमुळे वादात आणि चर्चेत राहिला आहे.

वाचा-

पॉवर म्हणाली की, मला आता समजले आहे की, वॉर्न पुन्हा पुन्हा का अडचणीत येतो. जेव्हा मी वॉर्नला सांगितले की, तुम्ही पाठवत असलेले मेसेज योग्य नाहीत, तेव्हा तिने प्रत्यक्षात ‘एक्स-रेटेड’ मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

वाचा-

ती पुढे म्हणाली की, ‘जेव्हा शेन वॉर्न संदेश पाठवत होता, तेव्हा ते खूप विचित्र होते. तो एक वेडा माणूस आहे. त्याने मला पाठवलेल्या काही गोष्टी माझ्या दृष्टीने अत्यंत चुकीच्या होत्या. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा उत्तर दिले, तेव्हा त्याने खरोखरच एक्स-रेटेड गोष्टी पाठवायला सुरुवात केली. मला वाटतं हे खूप चुकीचं आहे. प्रत्येक वेळी तो कसा अडचणीत येतो, याचे आश्चर्य वाटण्याचं दुसरं कारण नाही.

वाचा-

वॉर्न हा जगातील प्रतिभावान फिरकीपटूंपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियासाठी त्याने ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याला जगातील महान लेग स्पिनर म्हटले जाते. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ७०८ विकेट आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९३ विकेट्स घेतल्या आहेत.

मैदानांबाहेरील प्रकरणांमुळे वॉर्न अनेकदा चर्चेत राहतो. विचित्र जीवनशैलीमुळे त्याला अनेकदा वादाचा सामना करावा लागला आहे. ड्रग्ज घेतल्याने ऑस्ट्रेलियन संघाने त्याच्यावर एक वर्षाची बंदीही घातली होती. पॉवरने केलेला आरोप हा त्याच्या आरोपांमध्ये नवीन भर टाकणारा आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: