‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’; सोमय्यांचा गंभीर आरोप


मुंबई: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक झाल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) शिवसेना (Shiv Sena) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर इतर नेत्यांचा नंबर आला आहे, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. (bjp leader kirit somaiya makes serious allegations on minister anil parab shiv sena and ncp)

किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत हा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर हा इतर लाभार्थ्यांचा क्रमांक लागणार असल्याचे सोमय्या यांनी म्हचले आहे. या लाभार्थ्यांमध्ये अनिल देशमुख यांचा मुलगा, जावई , भागीदार यांचा समावेश आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या वसुलीचा ओघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि अनिल परब यांच्यासारख्या नेत्यांपर्यंत गेला असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘दिवाळीनंतर बॉम्ब’, या वक्तव्यावरून रोहित पवारांचा फडणवीस यांना जोरदार टोला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. ऋषीकेश यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले असून देशमुख आणि ऋषीकेश यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जातील हे हास्यास्पद; चंद्रकांत पाटील यांचा टोला

ऋषीकेश देशमुख यांना यापूर्वीही ईडीने समन्स बजावला आहे. दरम्यान, अनिल देशमुख हे या प्रकरणातील मुख्य लाभार्थी होते असे ईडीचे न्यायालयात सांगितले आहे. तसेच देशमुख हे मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात थेट सहभागी असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढू नका, अन्यथा…’; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: