कमाईच्या बाबतीतही विराटच किंग; जाणून घ्या त्याचा बंपर कमाईचा फॉर्म्युला!


मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीची गणना जगातील अव्वल क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. तसेच क्रीडा जगतातील दिग्गजांमध्येही तो सामील झाला आहे. कारण त्याच्या कमाईचे प्रमाण फक्त क्रिकेटपुरते मर्यादित राहिले नाही. त्याने व्यावसायिक क्षेत्रातही आपले पाय पसरले आहेत. विराट कोहली हा क्रिकेट जगतातील श्रीमंत खेळाडू आहे, त्याचे एकूण उत्पन्नच त्याच्या कमाईचे दाखले देतात. रिपोर्ट्सनुसार, कोहलीची वार्षिक कमाई जवळपास १३० कोटी रुपये आहे. तसेच त्याची एकूण संपत्ती ९०० कोटींपेक्षा जास्त आहे. भारतीय कर्णधाराची बहुतेक कमाई ब्रँड एंडोर्समेंट्स, जाहिराती आणि स्टार्टअप्समधून येते.

वाचा- Video: हॅट्रिक चेंडूवर कॅच सोडला; गोलंदाजाने सुनावले आणि माफी मागायला लावली

विराट कोहली हा बीसीसीआयच्या केंद्रीय करारातील ए प्लस (A+) श्रेणीचा खेळाडू आहे. त्याच्याशिवाय रोहित आणि बुमराह हे दोन खेळाडू या ग्रेडमध्ये आहेत. या श्रेणीतील खेळाडूंचे वार्षिक वेतन ७ कोटी रुपये आहे. याशिवाय विराट वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारातील प्रत्येक सामन्यासाठी मिळणाऱ्या मानधनातून तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल काही रक्कम मिळते, जी काही लाखांमध्ये असते. दुसरीकडे आयपीएलमध्ये विराट कोहलीला आरसीबीकडून दरवर्षी १७ कोटी रुपये पगार मिळतो.

वाचा- आव्हान संपुष्टात आल्यानंतर वेस्ट इंडिजला बसला मोठा झटका; या दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती

विराट कोहलीच्या कमाईचा स्रोत फक्त क्रिकेटच नाही, तर जाहिरातीमधूनही तो बक्कळ कमाई करतो. असे अनेक ब्रँड्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून विराट करोडोंची कमाई करतो. यामध्ये व्ह्रोग (Wrogn), वन एट (One8), पुमा (Puma), ऑडी (Audi), एमआरएफ (MRF), कोलगेट पामोलिव्ह (Colgate-Palmolive) आणि टिसॉट (Tissot) सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. एका अहवालानुसार, ब्रँड एंडोर्समेंटमधून त्याची वार्षिक कमाई १७८.७७ कोटी रुपये आहे.

वाचा- आव्हान संपुष्टात आल्यानंतर वेस्ट इंडिजला बसला मोठा झटका; या दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती

कुबेराचा हात ज्याच्या डोक्यावर आहे, तो कोहली वाहनांचा मोठा शौकीन आहे. मुंबईतील वरळी येथे एका आलिशान अपार्टमेंटमध्ये त्याचं घर आहे, ज्याची एकूण किंमत ३४ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे वाहनांची मोठी रांग आहे, ज्यात R8 V10 Plus, R8LMX, Audi RS5, Audi Q8, Land Rover Vogue, Bentley Flying Spur, Bentley Continental GT या मॉडेल्सचा समावेश आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: