विद्यमान विजेते वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीत गारद; श्रीलंकेने दिला झटका


अबुधाबी: आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे सर्वाधिक दोन वेळा विजेतेपद मिळणारे आणि विद्यमान विजेते वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. काल गुरुवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा २० धावांनी पराभव केला आणि विद्यमान विजेत्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. चार सामन्यात वेस्ट इंडिजला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आलाय आता ग्रुप ए मधून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी चुरस असेल.

वाचा-कॅच पकडला नाही म्हणून स्वत:च्या संघातील खेळाडूला घातल्या शिव्या, पाहा व्हिडिओ

या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिकुल परिस्थितीत श्रीलंकेने १८९ धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून असलंकाने ४१ चेंडूत ६८ धावा तर निसांकाने ४१ चेंडूत ५१ धावा गेल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागिदारी केली. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे होते. पण त्याच्याकडून शिमरोन हेटमायर आणि निकोलस पुरन वगळता अन्य कोणालाही दुहेरी धावसंख्या करता आली नाही. हेटमायरने ५४ चेंडूत नाबाद ८१ तर पुरनने ३४ चेंडूत ४६ धावा केल्या. २० षटकात वेस्ट इंडिजला ८ बाद १६९ धावा करता आल्या.

वाचा- खळबळजनक आरोप; विराट कोहलीने MS धोनीचे ऐकले नाही, कोणी त्याच्या विरोधात…

ग्रुप ए मधून आतापर्यंत तीन संघ स्पर्धे बाहेर झाले आहेत. त्यामध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. तर भारताचा समावेश असलेल्या ग्रुप बी मधून फक्त स्कॉटलंड बाहेर गेली आहे. वेस्ट इंडिजने टी-२० वर्ल्डकपचे सर्वाधिक दोन विजेचेपद मिळवली आहेत. त्यांनी २०१२ साली पहिले तर २०१६ साली दुसरे विजेतेपद मिळवले होते. या वर्षी वेस्ट इंडिज संघाची कामगिरी अतिशय खराब झाली. पहिल्या सामन्यात इंग्लंडने आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने त्यांचा पराभव केला. तिसऱ्या लढतीत बांगलादेश विरुद्ध विजय मिळवून त्यांनी स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले होते. पण श्रीलंकेने शानदार गोलंदाजी करून त्यांना पराभवाचा धक्का दिला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: