Video: हॅट्रिक चेंडूवर कॅच सोडला; गोलंदाजाने सुनावले आणि माफी मागायला लावली


अबुधाबी: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर शानदार विजय मिळवला. प्रथम गोलंदाजी करत त्यांनी बांगलादेशचा फक्त ७३ धावांवर ऑलआऊट केला आणि त्यानंतर फक्त ६.२ षटकात विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एडम जंपाने पाच विकेट घेतल्या. जंपासाठी ही मॅच खास ठरली असली तरी यात अशी एक घटना झाली जी तो कधीच आठवण्याचा प्रयत्न करणार नाही.

वाचा- विद्यमान विजेते वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीत गारद; श्रीलंकेने दिला झटका

पाच विकेट घेतल्याबद्दल जंपाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. बांगलादेशच्या डावात ११व्या षटकात त्याने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग दोन विकेट घेतल्या. त्याच्या पुढील ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जंपाला हॅट्रिक घेण्याची संधी होती. १५व्या षटकात जेव्हा त्याने पहिला चेंडू टाकला तेव्हा हॅट्रिकची संधी होती. त्याने चेंडू देखील तसा टाकला होता. बांगलादेशचा फलंदाज तस्कीन अहमदच्या बॅटला लागून चेंडू विकेटकीपरकडे गेला. पण ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर मॅथ्यू वेडने तो कॅच सोडला आणि जंपाला हॅट्रिक पूर्ण करता आली नाही. कॅच सोडल्यामुळे वेड देखील निराश झाला. तर जंपाला देखील विश्वास बसला नाही की असे कसे झाले. या घटनेनंतर जंपाने वेडाला आठवण करून दिली की, हा माझा हॅट्रिक चेंडू होता. त्यावर वेड म्हणाला की, हो मला माहिती आहे. मी चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओ आयसीसीने सोशळ मीडियावर शेअर केला आहे.

वाचा- आव्हान संपुष्टात आल्यानंतर वेस्ट इंडिजला बसला मोठा झटका; या दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती


वाचा- खळबळजनक आरोप; विराट कोहलीने MS धोनीचे ऐकले नाही, कोणी त्याच्या विरोधात…

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ८ विकेट आणि ८२ चेंडू राखून विजय मिळवाल. टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला हा दुसरा मोठा विजय आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: