धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचे व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक अकाऊंट हॅक


मनोज जालनावाला | नवी मुंबई :

अज्ञात हॅकरने नेरुळमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक अकाऊंट हॅक करुन त्यांच्या नातेवाईक आणि मित्र मंडळींना धमकीचे मेसेज पाठवले आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या हॅकरने कुटुंब प्रमुखाचा ई-मेल आयडी हॅक करुन त्यांच्या नावाने व कुटुंबियांच्या नावाने वेगवेगळ्या देशातील हॉटेल बुकिंग केल्याचं देखील उघडकीस आलं आहे. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात हॅकरविरोधात आयटी ॲक्टसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार नेरुळमधील सेक्टर-१९ मध्ये कुटुंबासह वास्तव्यास असून १७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या ई-मेलवर हॉटेलचे बुकिंग केल्याचा ईमेल आला होता. मात्र तक्रारदाराने सदरचं बुकिंग केलं नसल्याने त्यांनी बुकिंग रद्द करण्यास सांगितलं. मात्र त्यानंतर त्यांना थायलंड येथील हॉटेलचं बुकिंग करण्यात आल्याचा ईमेल मिळाला. सदरची बुकिंगही त्यांनी ईमेल पाठवून रद्द केली. त्यानंतर तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने स्विर्त्झलँड येथील हॉटेलमध्ये ४ जणांसाठी बुकिंग केल्याचा ईमेल त्यांना प्राप्त झाला. अशाच पद्धतीने अज्ञात हॅकरने तक्रारदार व त्यांची पत्नी व मुलगा यांच्या नावाने वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स कंपनीकडून हॉटेलच्या बुकिंगचे ईमेल पाठवून त्यांना त्रास दिला.

Anil Deshmukh Case: देशमुख यांना ईडीचा आणखी एक धक्का; आता मुलाला समन्स, पाडव्यालाच…

त्यानंतर अज्ञात हॅकरने तक्रारदाराच्या पत्नीचे फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप हॅक करुन त्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईकांना ते कुटुंबासह मलेशिया येथे अडकल्याचा मेसेज पाठवला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना संपर्क साधल्यानंतर त्यांच्या पत्नीचे फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप हॅक करण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यानंतर अज्ञात हॅकरने तक्रारदाराचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करुन त्याच्यावरुन त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळींना धमकीचे मेसेज पाठवले. तसंच त्याने तक्रारदाराचा मुलगा आणि मुलगी या दोघांचे सुद्धा व्हॉट्सअ‍ॅप हॅक करुन त्याच्यावरुन सुद्धा नातेवाईक व मित्र मंडळींना मेसेज पाठवून त्यांना त्रास दिला.

दरम्यान, मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे सदर कुटुंब त्रस्त झाले असून मानसिक दडपणाखाली आले आहे. त्यामुळे या कुटुंबाने नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात हॅकरविरोधात आयटी अ‍ॅक्टसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: