Aryan Khan Case: किरण गोसावीबाबत धक्कादायक पुरावे हाती; मुंबई पोलीस करणार मोठी कारवाई


हायलाइट्स:

  • क्रूझ पार्टी खंडणी प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती.
  • गुन्हा दाखल करून पोलीस गोसावीला ताब्यात घेणार.
  • पूजा ददलानीलाही समन्स बजावले जाण्याची शक्यता.

मुंबई:क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील खंडणीच्या आरोपाबाबत मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून याआधारे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यात किरण गोसावी याच्याबाबत महत्त्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले असून गुन्हा दाखल होताच त्याला पुणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याच प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी हिचा जबाबही नोंदवून घेतला जाणार असून तिला समन्स पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ( Aryan Khan Case Update )

वाचा: CCTV फुटेजमध्ये दिसली शाहरुखच्या मॅनेजरची कार, ‘ती’ महिला कोण?

आर्यन खान याला २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आलं होतं तर ३ ऑक्टोबर रोजी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या दरम्यान आर्यनवर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, त्याच्यावर अटकेची कारवाई होऊ नये, यासाठी बऱ्याच घडामोडी घडल्याचे आता समोर येऊ लागले आहे. २ तारखेच्या मध्यरात्रीनंतर घडलेल्या घडामोडींचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी, क्रूझ ड्रग्ज पार्टीतील पंच साक्षीदार किरण गोसावी, त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल तसेच ददलानी व गोसावी यांच्यातील मध्यस्थ सॅम डिसूझा यांच्याबाबत महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

वाचा: वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या; २ दलित संघटनांची तक्रार, केली ही मागणी

लोअर परळच्या बिग बाझारजवळील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यात पूजा ददलानी यांची मर्सिडीज कार, गोसावीची इनोव्हा आणि सॅम डिसूझाची इनोव्हा दिसत आहेत. मर्सिडीजमधून एक महिला उतरली आणि गोसावीशी काहीतरी बोलून काही वेळातच निघून गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही महिला म्हणजे पूजा ददलानी होती की अन्य कोणी, हे स्पष्ट झालेले नाही. गंभीर बाब म्हणजे गोसावीच्या इनोव्हा कारवर पोलीस अशी पाटी दिसत आहे. त्यामुळे तो पुरता अडकण्याची चिन्हे आहेत. खंडणी वसुली तसेच पोलीस पाटीचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी पूजा ददलानीचे या प्रकरणात थेट नाव येत असल्याने जबाब नोंदवण्यासाठी तिला समन्स बजावले जाण्याचीही शक्यता आहे.

वाचा: दिवाळीनंतर नवाब मलिक मोठा धमाका करण्याच्या तयारीत; ‘हे’ ट्वीट सगळं सांगून जातं!

दरम्यान, प्रभाकर साईल याने याप्रकरणात खंडणी वसुलीचा आरोप केला होता. आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागण्यात आली. तडजोडीने हे डील १८ कोटीला फायनल करण्यात आले. त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना दिले जाणार होते. गोसावी आणि सॅम याच्यातील याबाबतचे संभाषण मी ऐकले आहे, असा दावा प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्रावर केलेला आहे. त्याच आरोपाच्या आधारावर एसआयटीचा तपास सुरू आहे.

वाचा: देशमुख यांना ईडीचा आणखी एक धक्का; आता मुलाला समन्स, पाडव्यालाच…Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: