नवी मुंबईत धक्कादायक घटना; तरुणाने क्षुल्लक कारणातून केली मित्राची हत्यामनोज जालनावाला | : पनवेल भागात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या मित्राला अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत नेऊन त्याला इमारतीवरुन खाली ढकलून देत त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आदित्य अजित शेकाटे (१८) असं मित्राला इमारतीवरुन ढकलून देणाऱ्या आरोपी तरुणाचं नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

या घटनेतील मृत प्रथमेश रमेश राणे (१९) हा पनवेलच्या सावरकर चौकातील हरीओम अपार्टमेंटमध्ये तर त्याची हत्या करणारा आरोपी आदित्य शेकाटे हा पनवेलमधील परदेशी आळीत वास्तव्यास होता. प्रथमेश व आदित्य हे दोघेही मित्र असून ते दोघे नशा करत होते. प्रथमेशकडे असलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल व ब्ल्यूट्यूथ स्पीकर आरोपी आदित्यला हवा असल्याने त्याने बुधवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास प्रथमेशला नशा करण्याच्या बहाण्याने साईनगर परिसरातील साई डेव्हलपर्सच्या अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत नेले होते. यावेळी आदित्यने प्रथमेश जवळचा मोबाइल व स्पीकर जबरदस्तीने लुटल्यानंतर प्रथमेशने आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्पीकर लुटल्याचं प्रथमेश सगळ्यांना सांगेल अशी आदित्यला भीती वाटल्याने त्याने प्रथमेशला सदर इमारतीवरून खाली ढकलून दिले.

यावेळी प्रथमेशच्या खांद्यामध्ये लोखंडी सळई घुसल्याने व त्याच्या डोक्याला गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र तो खाली पडताना मोठा आवाज झाल्याने त्या भागात राहणाऱ्या काही नागरिकांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, प्रथमेश इमारतीवरुन खाली पडल्याचे आढळून आले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, आरोपी आदित्य हा सदर इमारतीमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच ठिकाणी त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, पोलिसांनी आदित्य शेकाटे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यानेच प्रथमेशला इमारतीवरुन ढकलल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आदित्यला अटक केली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: