जाणून घ्या पेट्रोल-डिझेल स्वस्त करणारे ‘उत्पादन शुल्क’ म्हणजे नेमकं काय?


हायलाइट्स:

  • सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली.
  • उत्पादन शुल्काला अबकारी कर असेही म्हणतात.
  • २६ जानेवारी १९४४ रोजी भारतात उत्पादन शुल्काचा नियम लागू करण्यात आला होता.

मुंबई : दिवाळीच्या एक दिवस आधी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील नागरिकांना दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकार देशातील १३० कोटी जनतेला महागाईपासून दिलासा देण्याचा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. केंद्र सरकारने देशभरात डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी आणि पेट्रोल ४ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर ४ नोव्हेंबरपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे.

सवंत्सर २०७७ ची निराशाजनक सांगता; अखेरच्या सत्रात झालेल्या नफावसुलीने सेन्सेक्स-निफ्टी गडगडले
पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर
राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ११०.०४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९८.४२ रुपये प्रति लीटर या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईही गगनाला भिडली आहे, पण पेट्रोलच्या किमतीवर ५ रुपये आणि डिझेलच्या दरात १० रुपयांनी उत्पादन शुल्क कमी केल्याने सर्वसामान्यांना नक्कीच काहीसा दिलासा मिळेल. पेट्रोलच्या दरात ५ रुपयांची घसरण झाली असली तरी पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वर राहणार आहेत.

स्वस्ताईची पहाट! शुल्क कपातीनंतर जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
उत्पादन शुल्क म्हणजे काय?
उत्पादन शुल्काला अबकारी कर असेही म्हणतात. हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे, जो एखाद्या वस्तूच्या उत्पादनावर आकारला जातो. एखाद्या वस्तूचा निर्माता किंवा उत्पादक त्याच्या उत्पादनावर उत्पादन शुल्क लावून ग्राहकांकडून वसूल करतो. उत्पादक त्याच्या उत्पादनावर आकारले जाणारे उत्पादन शुल्क त्या वस्तूवर लावलेल्या उर्वरित करात जोडून गोळा करतो. त्यानंतर तो त्याच्या उत्पादनावर ग्राहकांकडून वसूल केलेल्या उत्पादन शुल्काची रक्कम सरकारकडे जमा करतो. त्यामुळे सरकारला दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो.

मुहूर्ताला गुंतवणूक ; ट्रेडस्मार्टने गुंतवणूकदारांना जाहीर केली ‘मुहूर्त ट्रेडिंग’वर सवलत
भारतात उत्पादन शुल्काचा नियम कधी लागू झाला?
देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीच म्हणजेच २६ जानेवारी १९४४ रोजी भारतात उत्पादन शुल्काचा नियम लागू करण्यात आला होता. उत्पादन शुल्क किंवा अबकारी कर हा एक कर आहे, जो केवळ उत्पादनाच्या विक्रीवर लावला जातो. याशिवाय विक्रीसाठी तयार केलेल्या उत्पादनावरही उत्पादन शुल्क आकारले जाते. उत्पादन शुल्काला आता केंद्रीय मूल्यवर्धित कर (CENVAT) असेही म्हणतात. कोणत्याही उत्पादनावर उत्पादन शुल्क लादण्याचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त महसूल गोळा करणे हा आहे, जेणेकरून देशाच्या विकासासाठी या निधीचा वापर करता येईल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: