ते माझी ताकद ओळखून आहेत; नवाब मलिक यांचा रोख कुणाकडे?


हायलाइट्स:

  • नवाब मलिक यांची शेरोशायरी सुरूच
  • आज पुन्हा केलं सूचक ट्वीट
  • विरोधकांची उडवली खिल्ली

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात गेल्या महिनाभरापासून रोजच्या रोज धक्कादायक गौप्यस्फोट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे रविवारी मोठा धमाका करणार आहेत. कालच एक ट्वीट करून त्यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

सध्या दिवाळी सुरू असल्यानं राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबल्या आहेत. मात्र ही वादळापूर्वीची शांतता आहे. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर बनावट कारवायांचा व खंडणीखोरीचा आरोप केल्यानंतर नवाब मलिक यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. त्या संदर्भातील काही फोटोही त्यांनी प्रसिद्ध केले होते. फडणवीस यांनी हे आरोप खोडून काढताना मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. दिवाळीनंतर याचे पुरावे देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.

वाचा: ड्रग्ज प्रकरणात बनावट कारवायांचा आरोप झालेले समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी

नवाब मलिक यांनी फडणवीसांचं हे आव्हान स्वीकारलं आहे. मी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर बुधवारी त्यांनी एक ट्वीट करून हॉटेल ‘द ललित’मध्ये अनेक गुपितं दडली असल्याचं म्हटलं आहे. ही गुपितं नेमकी काय आहेत? त्यांचा संबंध देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे की समीर वानखेडे यांच्याशी, यावर आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी ट्वीट केलं आहे. ‘न खंजर उठेगा, न तलवार इनसे… ये बाजू मेरे आजमाए हुए है।’ असं मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
फडणवीस यांचा आरोपांचा बार फुसका ठरेल, असं मलिक यांनी आपल्या ट्वीटमधून सूचित केलं आहे. ‘कोणी कितीही आव्हान आणि इशारे दिले तरी काही होणार नाही. कारण, ते मला ओळखून आहेत. मी काय करू शकतो हे त्यांना कळून चुकलं आहे,’ असं मलिक यांनी म्हटलं आहे. मलिक यांचं ट्वीट म्हणजे भाजपसाठी इशाराच मानला जात आहे.

वाचा: दिवाळीनंतर नवाब मलिक मोठा धमाका करण्याच्या तयारीत; ‘हे’ ट्वीट सगळं सांगून जातं!Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: