Rohit Sharma Six: हिटमॅन रोहितचा तडाखा; विराट कोहलीला जागेवरून उठवले, Video


अबुधाबी: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर भारताने पहिला विजय साकारला. पहिल्या दोन लढतीत झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केले आणि अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारताचे सेमीफायनमध्ये पोहोचण्याचे आव्हान कामय राहिले आहे. भारताकडून रोहित शर्माने स्फोटक फलंदाजी केली. त्याने ४७ चेंडूत ७४ धावांची खेळी केली.

वाचा- धक्कादायक वक्तव्य; रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाल्यास होणार मोठे नुकसान

भारताचे सलामीवीर रोहित आणि केएल राहुल यांनी अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी १४० धावांची भागिदारी केली. यामुळे भारताला २१० धावांचा डोंगर उभा करता आला. राहुल आणि रोहित यांनी फक्त ८९ चेंडूत १४० धावा केल्या. रोहितने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. तर राहुलने ४८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या. या दोघांनी धमाकेदार सुरूवात करून दिल्यानंतर ऋषभ पंतने १३ चेंडूत २७ तर हार्दिक पंड्याने १३ चेंडूत ३५ धावा करून मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.

वाचा-सारा तेंडुलकर आणि शुभमनचे ब्रेकअप? क्रिकेटपटूने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

या सामन्यात रोहितने पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर असा एक षटकार मारला जो सीमारेषेबाहेर भारतीय संघाच्या डगाउटमध्ये जाऊन पडला. लॉन्ग ऑफच्या दिशेने हवेत मारलेल्या या षटकाराचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. रोहितने मारलेला हा षटकार कर्णधार विराट कोहलीच्या जवळ गेला. त्याने चेंडू कॅच करून पुन्हा अफगाणिस्तानच्या खेळाडूकडे दिला.


अफगाणिस्तानने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. भारताच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरूवात करून दिली. पहिल्या सहा षटकात ५३ धावा, १० षटकात ८५ धावा केल्या. रोहितने ३७ चेंडूत अर्धशतक केले तर ११ व्या षटकात संघाच्या १०० धावा पूर्ण केल्या. गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नसलेल्या हार्दिक पंड्याने देखील आक्रमक फलंदाजी करण्याची संधी सोडली नाही.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: