pollution: आता तुम्हीच घरबसल्या मोजू शकता गोंगाट!; नीरीचे ‘नॉईज ट्रॅकर अ‍ॅप’


हायलाइट्स:

  • ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी नीरीचे ‘नॉईज ट्रॅकर अ‍ॅप’.
  • नागरिकांनी यंदाच्या दिवाळीत आपआपल्या परिसरात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करावे- नीरीचे आवाहन.
  • हे अ‍ॅप भारताखेरीज अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा या देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

भारतात दिवाळी (Diwali) दरम्यान होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण (Air and noise pollution) सर्वश्रृत असून त्याची चर्चा आता जागतिक पातळीवर होऊ लागली आहे. यंदा दिवाळी दरम्यान नागपुरात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप नीरी (NEERI) (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था) करणार आहे. मात्र, नागरिकांनीच या ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करायचे आहे. त्यासाठी नागरिकांना नीरीने विकसित केलेल्या ‘नॉईज ट्रॅकर अ‍ॅप’चा उपयोग करता येणार आहे. (now you can count on air and noise pollution at home with noise tracker app by neeri)

गेल्या दोन वर्षांपासून नीरी दिवाळी दरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करते आहे. हे मोजमाप अधिक सोपे आणि व्यापक व्हावे या उद्देशाने नीरीने नॉईज ट्रॅकर नावाचे मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. याद्वारे नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करता येते. नागरिकांनी यंदाच्या दिवाळीत आपआपल्या परिसरात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करावे असे आवाहन नीरीने केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘अशी’ आहे राज्यातील करोनाची स्थिती! १,१९३ नव्या रुग्णांचे निदान

हे अ‍ॅप भारताखेरीज अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा या देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या अ‍ॅपच्या माध्यमातून दिवाळी दरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या मोजमापासाठी शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासोबतच नागरिकांनीसुद्धा हे अ‍ॅप डाऊनलोड करावे व ध्वनी प्रदूषण मोजावे, असे आवाहन नीरीने केले.

क्लिक करा आणि वाचा- ‘आम्हीही नको ती अंडी उबवली’, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नीलेश राणेंचा प्रहार

अशी आहे प्रक्रिया

> गुगल प्ले-स्टोअरमधून नॉईज ट्रॅकर हे अ‍ॅप डाऊनलोड करावे.
> जीपीएस सुरू ठेवत ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजावी.
> हा डाटा जतन करताच तो थेट क्लाऊडवर स्टोअर केला जाईल.
> याखेरीज नागरिक ९४२३६३००१६, ७०६६०८३५५३ या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपसुद्धा करू शकतात.
> नागरिकांनी किमान आवाजाच्या पातळीचे किमान तीन नमुने नोंदवावेत. ते नोंदविताना फटाक्यांपासून किमान २० मिटरचे अंतर राखावे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईत शासकीय, पालिका केंद्रांवर ४ दिवस लसीकरण बंद; महापालिकेची माहितीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: