IND vs AFG : भारताने विजयाचे फटाके फोडत केला दिवाळी धमाका, मिळवला विश्वचषकातील पहिलाच विजय…


आबुधाबी : दिवाळीला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाने विजयाचा धमाका केला. महत्वाच्या सामन्यात कामगिरी कशी उंचवायची, याचा उत्तम नमुना भारतीय संघाने आज दाखवून दिला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतके झळकावत संघाच्या विजयाचा पाया रचला. रोहित आणि राहुल बाद झाल्यावर हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांनी धडाकेबा फलंदाजी केल्यामुळे भारताला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला. भारताने या या सामन्यात विजयासाठी अफगाणिस्तानपुढे २११ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला भारताने एकामागून एक धक्के दिले. त्यामुळे भारताला या सामन्यात दणदणीत विजय साकारता आला.

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्येच संघाचे अर्धशतक झळकावले होते. अर्धशतक पूर्ण केल्यावरही रोहित आणि राहुल यांनी फटकेबाजी सुरुच ठेवली. रोहित शर्माने यावेळी चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले आणि सलामीला आपणच कसे योग्य आहोत, हे सर्वांना दाखवून दिले. रोहित पाठोपाछ राहुलनेही चौकारासह आपले अर्धशतक साजरे केले. आतापर्यंतच्या विश्वचषकातील तिन्ही सामन्यांमध्ये भारताची ही सर्वाधिक धावांची सलामी ठरली आहे. रोहित आणि राहुल यांनी अर्धशतक झळकावल्यावर सुसाट फलंदाजी केली. अफगाणिस्तानची गोलंदाजी ही चांगली मानली जात होती. पण रोहित आणि राहुल या दोघांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना यावेळी आपल्यापुढे लोटांगण घालण्यास भाग पाडले. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीतील हुकमी एक्का रशिद खान समजला जातो, पण रशिद खानच्या १४व्या षटकात रोहितने सलग दोन षटकार लगावले. पण त्यानंतरच्या १५ व्या षटकात मात्र रोहितला आपली विकेट गमवावी लागली. अफगाणिस्तानच्या करिम जनातने यावेळी कर्णधार मोहम्मद नबीकरवी रोहितला झेलबाद केले. रोहितने यावेळी ४७ चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांसह ७४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. अफगाणिस्तानच्या गुलबदिनने राहुलला यावेळी बाद केले. राहुलने ४८ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६९ धावा केल्या.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: