pm modi diwali with jawans : PM मोदी यंदा राजौरीमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार


जम्मूः पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा आपली दिवाळी जवानांसोबत सोबत साजरी करणार ( pm modi celebrates diwali with jawans ) आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सीमेच्या सुरक्षेवर असलेल्या जवानांसोबत साजरी करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे दिवाळीला जम्मूतील राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरला जाणार आहेत. दरम्यान, भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे हे जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आघाडीच्या चौक्यांवर जाऊन जवानांशी संवाद साधला. यापूर्वी त्यांनी १८ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता.

पंतप्रधान मोदी दिवाळीला नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या नौशेरा ब्रिगेडला जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे राजौरीत नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोधैर्य उंचावले आहे, असं उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्ये शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर दहशतवादाविरोधात मोहीम राबवली जात आहे. भारतीय लष्कराने राजौरीला लागून असलेल्या पूंछ जिल्ह्यातील बाटाधुलियन जंगलात दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली होती. यादरम्यान, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे ९ जवान शहीद झाले. हा परिसर दहशतवादमुक्त करण्यासाठी लष्कराचे जवान लढत आहेत.

abhinandan varthaman : अभिनंदन! बालाकोट एअर स्ट्राइक हिरो अभिनंदन यांचं ग्रुप कॅप्टनपदी प्रमोशन

गेल्या ४ महिन्यांत १४ जवानांनी हौतात्म्य पत्करले आहे. अशा स्थितीत पंतप्रधानांच्या भेटीने जवानांचे मनोबल वाढवणे महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडचे सर्व वरिष्ठ लष्करी अधिकारीही नौशेरा येथे उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा सुरक्षित करण्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नौशेरा येथे तळ ठोकला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, लष्कराने अद्याप पंतप्रधानांच्या भेटीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

pm modi pitches for door to door vaccination : संथ लसीकरणावरून PM मोदींचा इशारा, दिला घरोघरी….

दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वर्षांत दुसऱ्यांदा राजौरी दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी, जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370, 35-अ रद्द केल्यानंतर २०१९ मध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी राजौरी येथे आले होते. राजौरी येथील लष्कराच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: