लोकांना मुर्ख बनवणं थांबवा; किरीट सोमय्यांची अजित पवारांवर टीका


हायलाइट्स:

  • अजित पवारांच्या मालमत्तांच्या जप्तीची चर्चा
  • किरीट सोमय्यांनी साधला निशाणा
  • किरीट सोमय्यांचे ट्वीट चर्चेत

मुंबईः प्राप्तिकर खात्याने मंगळवारी कारवाई करून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्याशी संबंधित चार महत्त्वाच्या मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्याची चर्चा आहे. मात्र, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही मालमत्तेवर प्राप्तिकर विभागाने टाच आणलेली नाही. याबाबतचे वृत्त निराधार आहे, असं स्पष्टीकरण अजित पवारांच्या वकिलांकडून देण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकरणानंतर भाजपचे नेते किरीय सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एक ट्वीट केलं आहे.

किरीट सोमय्यांनी एक ट्वीट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवार लोकांना मूर्ख बनवणे थांबा. तुमच्या नातेवाईक व मित्र कंपन्यांचे हजारो कोटींहून अधिक बेनामी आणि नामी साम्राज्य आठपेक्षा अधिक शहरांमध्ये पसरलं आहे. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तुम्ही स्थापन केलेली आहे. त्यासाठी १३ वर्षांपूर्वी १०० कोटी रुपये मिळाले होते, ते परत आले की नाही?, असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

वाचाः मी लस घेतली नाही, घेणारही नाही; इंदुरीकर महाराजांनी सांगितलं करोनावरील औषध

दरम्यान, आयकर विभागाच्या या वृत्ताचं अजित पवारांकडून खंडन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर प्राप्तिकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्या संदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. या संदर्भात माध्यमांत आलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत आणि खोडसाळपणाचे आहे,’ असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले, ‘अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्या संदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. प्राप्तिकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं होतं.

वाचाः बात निकलेगी तो फिर…; नवाब मलिकांचे आणखी एक सूचक ट्वीटSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: