मुंबई-कोकण अंतर होणार कमी? एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा


हायलाइट्स:

  • मुंबई-सिंधुदुर्ग ही शहरं आणखी जवळ येणार?
  • दोन महामार्गांबाबत एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
  • कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही दिली ग्वाही

रत्नागिरी : कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि मुंबई-सिंधुदुर्ग ही शहरं आणखी जवळ आणण्यासाठी कोस्टल हायवे रुंदीकरण व ग्रीन फिल्ड रस्ता या दोन महामार्गाचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी मंगळवारी रत्नागिरीत केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांनी जिल्हयातील नगरपरिषद, नगरपंचायती यांच्या प्रशासकीय आणि विकासकामांचा आढावा जिल्हाधिकारी सभागृह येथे घेतला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

लांजा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन अखेर मागे; प्रवाशांना मोठा दिलासा

‘विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही’

‘कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी चांगले रस्ते आणि कनेक्टिव्हिटीची गरज आहे. ज्या ठिकाणी चांगले रस्ते असतात त्या ठिकाणचा विकासदेखील वेगाने होत असतो. कोकणामधील पर्यटन वाढीसाठी पायभूत सुविधांची गरज आहे,’ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असंही ते म्हणाले.

‘सर्वसामान्य माणसांच्या फायद्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून अनेक जनहिताचे चांगले निर्णय घेण्यात येत आहेत. या परिसरात मागणी केल्यानुसार उर्वरित रस्ते, सुशोभिकरण, जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल,’ असं आश्वासनही मंत्री शिंदे यांनी दिलं आहे.

दरम्यान, करोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी आपण शासनाकडून करण्यात आलेल्या नियमांचं पालन करा, असं आवाहनही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: