अजित पवारांशी संबधित संपत्तीवर जप्ती?; वकिलाकडून ‘हा’ मोठा खुलासा


हायलाइट्स:

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित संपत्तीवर जप्ती आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
  • मात्र, हे वृत्त निराधार आणि खोडसाळपणाचे असल्याचे पवार यांच्या वकिलांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
  • ‘पवार यांच्यांशी संबंधित संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही’

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने अटक केल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अजित पवारांशी संबंधित कोट्यावधींची संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाले होते. मात्र, अजित पवार यांच्याकडून या वृत्ताचा स्पष्टपणे इन्कार करण्यात आलेला आहे. (ajit pawar has revealed that the news that the income tax department has confiscated the property belonging to me is false)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार’; काँग्रेस नेत्याचे मोठे विधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल, असे अॅड. पाटील यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- चिंताजनक! करोनाच्या दैनंदिन मृत्यूसंख्येत वाढ; हजारावर नव्या रुग्णांचे निदान

या प्रकरणी प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- फडणवीसांवरील टीकेने भाजप आमदार संतापले; नवाब मलिक यांच्यावर केली बोचरी टीकाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: