इंधन दरवाढ थांबेना; आज पुन्हा महागले इंधन, जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधन दर


हायलाइट्स:

  • पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलमध्ये ३५ पैशांची वाढ केली.
  • आज कंपन्यांनी डिझेल दर जैसे थे ठेवले.
  • मागील सहा दिवसात पेट्रोल- डिझेल प्रत्येकी २.१० रुपयांनी महागले.

मुंबई : देशभरात आज पुन्हा एकदा पेट्रोल महागले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलमध्ये ३५ पैशांची वाढ केली. सहा दिवस दरवाढ केल्यानंतर आज कंपन्यांनी डिझेल दर जैसे थे ठेवले. मागील सहा दिवसात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी २.१० रुपयांनी महागले होते.

पेन्शनधारकांसाठी खूशखबर; लाइफ सर्टिफिकेटबाबत ‘एसबीआय’ने सुरु केली ‘ही’ सुविधा
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११५.८५ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल ११०.०४ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०६.६६ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११०.४९ रुपये इतके वाढले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११८.८३ रुपये असून बंगळुरात पेट्रोल ११३.९३ रुपये इतके वाढले आहे.

आता ‘मुंबई हाय’चे खासगीकरण; पेट्रोलियम मंत्रालयाचे ओएनजीसीला पत्र, दिले ‘हे’ निर्देश
मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०६.६२ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ९८.४२ रुपये इतके आहे. चेन्नईत १०२.५९ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव १०१.५६ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०७.९० रुपये असून बंगळुरात डिझेल १०४.५० रुपये आहे.

अर्थव्यवस्था सुस्साट; ऑक्टोबर महिन्यात जीएसटी महसुलात विक्रमी वाढ
तेलाची जागतिक बाजारपेठ तणावात असतानाही ओपेक आणि त्यांच्या सहकारी संस्था तेल उत्पादनात वाढ करण्याच्या आपल्या पूर्वनिर्धारित निर्णयावर ठाम आहेत. यामुळे तेलाच्या किमतींना आणखीच मदत मिळाली आहे. तेलाची मागणी आता करोना पूर्वस्थितीवर गेली आहे. सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव ८४.७१ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ८४.०५ डॉलर झाला.

दिवाळीपूर्वी बंपर कमाईची संधी; गुंतवणुकीसाठी आज खुले झाले या चार कंपन्यांचे IPO
तेलाची वाढती मागणी आणि मर्यादित उत्पादन यामुळे पुढील वर्षी कच्च्या तेलाचा भाव ११० डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज गोल्डमन साक्स या संस्थेने व्यक्त केला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: