bjp rally in jalgoan: भाजपाचा जळगावाच मोर्चा; जिल्हापरिषद अध्यक्षांना आली भोवळ


हायलाइट्स:

  • जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांना मोर्चात आली भोवळ.
  • त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपने आयोजित केला होता मोर्चा.

म.टा. प्रतिनिधी, जळगाव

भाजपच्या (BJP) वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील (Ranjana Patil) यांना भोवळ आली. त्यांना तातडीने चारचाकीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेवेळी हा प्रकार घडला. (jalgaon zilla parishad president got dizzy in the bjp rally organised on farmer issue)

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी दुपारी भाजपच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी दुपारी १२ वाजतांची वेळ देण्यात आलेली होती. मात्र , नियोजित वेळेपेक्षा तब्बल ३ तास उशिराने म्हणजेच, दुपारी ३ वाजता हा मोर्चा सुरू झाला.

क्लिक करा आणि वाचा- अमृता फडणवीस नवाब मलिकांवर संतापल्या; म्हणाल्या, ‘बेनकाब नवाब भी होता हैं’

मोर्चात सहभागी झालेली भाजपची नेतेमंडळी एका ट्रॅक्टरवर उभे राहून मोर्चात सहभागी शेतकरी व कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. याचवेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील या देखील नेत्यांसोबत ट्रॅक्टरवर उभ्या होत्या. भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे भाषण सुरू असताना रंजना पाटील अचानक भोवळ येऊन ट्रॅक्टरवरच खाली कोसळल्या. त्यावेळी खासदार रक्षा खडसे व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना सावरले. मात्र, अस्वस्थ वाटत असल्याने रंजना पाटील यांना तातडीने चारचाकीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे भाजप नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रंजना पाटील यांच्याप्रमाणेच एका भाजपा कार्यकर्त्याला देखील अशाच प्रकारे गर्दीत भोवळ आली.

क्लिक करा आणि वाचा- ‘हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या १९ बंगल्यांबद्दल बोला’; भाजपचे मलिकांना आव्हान

मोर्चात चोरट्यांचा सुळसुळाट

भाजपच्या मोर्चात हजर असलेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या खिशामधून चोरट्यांनी पैसे व मोबाइल लांबवले. यात किरणसिंग विजसिंग देवळे (रा. कडगाव) यांच्या खिशातून ४० हजार, बाळु शंकर पाटील (रा. कडगाव) यांच्या खिशातून ४ हजार ५००, संदीप मोतीलाल सरताळे (रा. वाघाडी, ता. जामनेर) यांच्या खिशातून ५० हजार रुपये व योगेश वसंतराव मोहते (रा. जामनेर) यांचा १७ हजार ५०० रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी लांबवला.

क्लिक करा आणि वाचा- ‘आमच्याही हातात दगड असू शकतात’; संजय राऊत यांचा भाजपला इशाराSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: