बहिणीच्या पाठवणीची तयारी सुरू असतानाच भावाच्या हौतात्म्याची बातमी घरी पोहचली


हायलाइट्स:

  • जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया
  • भूसुरुंग स्फोटात लेफ्टनंट ऋषी कुमार यांचा मृत्यू
  • लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर शोककळा

पाटणा : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या लेफ्टनंट ऋषी कुमार यांचं पार्थिव रविवारी त्यांच्या मूळ गावी अर्थात बिहारच्या बेगुसरायमध्ये दाखल झालं. सिमरिया घाटावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी शहिदाला अखेरचा निरोप देण्यासाठी गाव लोटलं होतं.

शनिवारी, ३० ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात दोन जवान शहीद झाले आणि तीन जण जखमी झाले होते. त्यापैंकीच एक लेफ्टनंट ऋषी कुमार आहेत. नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगावर पाय पडल्यानं त्यांचा स्फोट झालाय या स्फोटात दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी कुमार यांचं संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत होतं. येत्या २९ नोव्हेंबर रोजी ऋषी कुमार यांच्या बहिणीचा विवाह निश्चित करण्यात आला होता. ऋषी कुमार यांना दोन बहिणी आहेत. सर्वात लहान बहिणीचा विवाह २९ नोव्हेंबर रोजी होणार होता. यासंबंधी ऋषी यांनी आईशी चर्चा करून सगळ्या तयारीची विचारपूसही केली होती. आपल्या बहिणीच्या पाठवणीसाठी ऋषी कुमार सुट्टी घेऊन २२ नोव्हेंबर रोजी घरी परतण्याचाही बेत करत होते. मात्र, बहिणीच्या पाठवणीपूर्वीच तिरंगा चढवून ऋषी कुमार यांचं पार्थिव त्यांच्या घरी दाखल झालं आणि कुटुंबासहीत संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
Uttar Pradesh: देशातील ४६ रेल्वे स्टेशन्स बॉम्बस्फोटात उडवण्याची धमकी, अलर्ट जारी
UP Elections: …तर तालिबानविरुद्ध एअरस्ट्राईक निश्चित, योगींनी भरला दम

लेफ्टनंट ऋषी कुमार हुतात्मा झाल्याची बातमी त्यांच्या कंपनी कमांडरनं कुटुंबाला रात्री उशिरा ७.३० वाजल्यादरम्यान दिली होती. ऋषी कुमार यांच्या वडिलांना फोनवरून ही बातमी समजल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

बंगुसराय जिल्हा मुख्यालयाचे प्राध्यापक कॉलनीचे रहिवासी असलेल्या राजीव रंजन हे ऋषी कुमार यांचे वडील… जवळपास वर्षभरापूर्वीच ऋषी लष्करात दाखल झाले होते. ऋषी यांचे आजोबाही रिफायनरीमध्ये कार्यरत होते.

धक्कादायक! करोना काळात देशात दररोज ३१ मुलांच्या आत्महत्या
Munawar Faruqui: तीनदा सीम बदललं, धमक्या रोजच्याच : कॉमेडीयन मुनव्वर फारुकीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: