कोल्हापूरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ


हायलाइट्स:

  • कचऱ्याच्या ढिगाऱ्यात महिलेचा मृतदेह
  • पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
  • मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला

कोल्हापूर : पोत्यात बांधून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने देवकर पानंद परिसरात खळबळ उडाली आहे. सदर महिलेचा दोन दिवसांपूर्वी खून करून मृतदेह फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

जुना राजवाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही महिला ४० ते ४५ वर्षाची असून तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. सडलेल्या मृतदेहाचा वास आल्यामुळे नागरिकांनी कोंडाळ्यात पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

हृदयद्रावक: आजारी पत्नीचा मुंबईत मृत्यू; घरात पतीची गळफास घेऊन आत्महत्या

सदर महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून हा खून नेमका कोणी आणि कधी केला, याचा उलगडा शवविच्छेदन झाल्यानंतरच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या घटनेनंतर देवकर पानंद परिसरातील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या खून प्रकरणी अधिक तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: