T20 World Cup: ७ नोव्हेंबर भारतीय क्रिकेट संघासाठी मोठा दिवस ठरणार, जाणून घ्या कारण…


दुबई: युएईमध्ये सुरू असलेली आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा मध्यावर आली आहे. ग्रुप फेरीत अद्याप कोणत्याही संघाने अधिकृतपणे सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला नाही. ग्रुप ए मधून इंग्लंडने आणि ग्रुप बी मधून पाकिस्तानने सेमीफायनलमधील स्थान निश्चित केले आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी ज्या संघांची नावे विजेतेपदाच्या शर्यतीत होते त्या भारतीय संघाने पहिल्या दोन्ही लढती गमावल्या आहेत.

वाचा-विराटने खेळाडूंसोबत अस करायल नको होत; वर्ल्डकपमध्ये केली मोठी चूक

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा प्रथम पाकिस्तानने नंतर न्यूझीलंडने पराभव केला. या दोन पराभवामुळे भारताचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. भारताला सेमीफायनलमध्ये जायचे असेल तर अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करण्याचा चमत्कार करावा लागले. क्रिकेटमध्ये हा धक्कादायक विजय नोंदवला गेला तर भारताला सेमीफायनलची लॉटरी लागू शकते.

वाचा- विराट तुला याचे उत्तर द्यावे लागले; पाहा कोणी विचारला प्रश्न

ग्रुप बी मध्ये पाकिस्तानने ३ पैकी ३ लढती जिंकून अव्वल स्थान मिळवले आहे. अफगाणिस्तान दोन विजयासह दुसऱ्या तर न्यूझीलंड एका विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. ग्रुपमध्ये आता पाकिस्तानची लढत नामिबिया आणि स्कॉटलंड विरुद्ध आहे. तर भारत आणि न्यूझीलंडला अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबिया यांच्या विरुद्ध खेळायचे आहे.

वाचा- BCCIचा डाव उलटा पडला; वर्ल्डकप सुरु होण्याआधीच टीम इंडियाची पराभवाची तयारी

स्कॉटलंड आणि नामिबिया हे संघ दुबळे असल्याने त्यांच्याविरुद्ध विजय भारत आणि न्यूझीलंडसाठी अवघड असणार नाही. भारताची खरी परीक्षा अफगाणिस्तानविरुद्ध असेल. ही लढत ३ नोव्हेंबर रोजी म्हणजे बुधवारी होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास त्यांचे आव्हान कायम राहिल. पण एवढ्यावर सेमीफायनलचे तिकिट मिळणार नाही. न्यूझीलंड ग्रुप फेरीतील अखेरची लढत अफगाणिस्तानविरुद्ध ७ नोव्हेंबर रोजी खेळणार आहे. या लढतीवर भारताचे सेमीफायनलचे तिकिट ठरणार आहे. अफगाणिस्तान जिंकल्यास भारताला दुसऱ्या दिवशी म्हणजे नामिबियाविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळून पुढील फेरीत प्रवेश करता येईल. त्यामुळे टीम इंडिया आणि चाहत्यांची नजर ७ नोव्हेंबर रोजी दुपारी होणारी लढतीवर असेल.



Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: