नवाब मलिकांचे खळबळजनक ट्वीट; अमृता फडणवीसांचा फोटो शेअर करत म्हणाले…


हायलाइट्स:

  • नवाब मलिकांचे सकाळीच स्फोटक ट्वीट
  • मलिकांच्या रडारवर आता भाजप
  • अमृता फडणवीसांचा फोटो केला शेअर

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan drug case) आतापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचा एक फोटो ट्वीट केला आहे.

नवाब मलिक यांनी राजकीय विश्लेषकांनी केलेल्या एका ट्वीटचा आधार घेत भाजपला लक्ष्य केलं आहे. आज सकाळीच त्यांनी ट्विटरवरुन अमृता फडणवीसांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे.

चलो भाजपा और ड्रग्ज पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है, असं म्हणत नवाब मलिकांनी हा फोटो ट्विट केला आहे. तर, अन्य एका ट्वीटमध्ये या व्यक्तीचे नाव जयदीप राणा असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली आहे. तसंच, या ट्वीटनंतर आपण थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेत ते आणखी काय खुलासा करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचाः नवाब मलिकांनी उल्लेख केलेला तो व्यक्ती कोण?; राणेंनी दिलं प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा

दरम्यान, नवाब मलिकांनी काल पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय नीरज गुंडे हा एक दलाल असून, तो सध्या वारंवार अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्या (एनसीबी) कार्यालयात जातो, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. तसंच, वानखेडे यांचा संबंध देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गुंडे याच्याशी आहे. गुंडे कुणाचे पैसे कुठे लपवतो, हे मला माहिती आहे. त्याच्या चेंबूरच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. त्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः
समीर वानखेडे यांचा निर्णय महासंचालकांच्या हातीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: