धक्कादायक! सावंतवाडीत दोन वृद्ध महिलांचा निर्घृण खून


हायलाइट्स:

  • दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घृण खून
  • घटनेनं शहरात खळबळ
  • पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरात दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खून झालेल्या महिलांची नावे निलीमा नारायण खानोलकर आणि शालिनी शांताराम सावंत अशी आहेत. उभा बाजार परिसरात घडलेल्या या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या निलीमा खानविलकर या माझ्या जवळच्या नातेवाईक आहेत. मी त्यांची विचारपूस करत आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांना घरी टीव्ही लावून देण्यासाठी आलो असता हाक मारल्यानंतर त्यांनी आवाज दिला नाही. त्यामुळे मी थेट घरात गेलो तेव्हा त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. हा सर्व प्रकार पाहून मी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याला फोन करून दिली.

गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित अथवा वित्त हानी नाही!

हा प्रकार अज्ञात चोरट्यांकडून झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण खून झालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.

दरम्यान, या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: