IND vs NZ : करो या मरो सामन्यात भारतीय संघाचे वस्त्रहरण; न्यूझीलंडने केला मोठा पराभव


दुबई : न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या करो मरो सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे भारताला न्यूझीलंडसमोर ११ धावांचे माफक आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग न्यूझीलंडच्या संघाने केला. त्यामुळे भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा आता जवळपास संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे.

भारताच्या १११ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलने आक३मक सुरुवात केली. पण जसप्रीत बुमराने त्याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. पण त्यानंतर मात्र न्यूझीलंडला दुसरा सलामीवीर डॅरिल मिचेलने भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. मिचेलने यावेळी ३५ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४९ धावा केल्या, त्याचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. पण बाद होण्यापूर्वी मिचेने न्यूझीलंडला विजय मिळवून देण्यात आपली भूमिका चोख बजावली होती.

भारताचे फलंदाज एकामागून एक अपयशी ठरले आणि त्यामुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना ११० धावा करता आल्या. भारताला यावेळी सुरुवातीलाच मोठे धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. भारताने यावेळी फलंदाजीमध्ये मोठे बदल केला आणि त्याचाच फटका संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. भारताने यावेळी सलामीला रोहित शर्माला न पाठवता इशान किशला संधी देण्याचा प्रयोग केला. पण याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. कारण इशान यावेळी चार धावा करून बाद झाला. त्यानंतर लोकेश राहुलही सहाव्या षटकात बाद झाला, राहुलला यावेळी १८ धावा करता आल्या. रोहितला यावेळी सलामीला न पाठवता तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते. रोहित शर्माला यावेळी पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडूने रोहितच्या बॅटची कडा घेतली आणि न्यूझीलंडच्या अॅडम मिल्नेला यावेळी झेप पकडण्याची संधी होती. पण मिल्नेला हा झेल पकडता आला नाही आणि रोहितची एकही धाव झालेली नसताना त्याला जीवदान मिळाले. पण रोहितला या जीवदानाचा चांगला फायदा उचलता आला नाही. कारण न्यूझीलंडचा फिरकीपटू इशा सोधीने रोहितला मार्टिन गुप्तिलकरवी झेल बाद केले. रोहितने यावेळी एक चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३४ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर संघाची जबाबदारी कर्णधार विराट कोहलीवर होती. पण विराट यावेळी अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाला. कोहलीला यावेळी इश सोधीनेच बाद केले. कोहलीने यावेळी १७ चेंडूंमध्ये फक्त ९ धावा केल्या. रवींद्र जडेजाने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजीकेल्यामुळे भारताला शतकाची वेस ओलांडता आली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: