पाकचा विजय साजरा करणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना केला विरोध, यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून बाहेर काढले


चंदीगड: यूपी आणि बिहारमधील चार विद्यार्थ्यांना पंजाबमधील भटिंडा येथील बॉइज होस्टेलमधून बाहेर काढण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना विरोध केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर आहे. तसेच हॉटेलमधील तोडफोडीचा दंड विद्यार्थ्यांना भरण्याचे निर्देश दिले आहेत. पण काश्मिरी विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

होस्टेल रिकामे करण्यासाठी विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी ३० ऑक्टोबरच्या रात्री होस्टेलच्या शिस्त मोडली आहे. बाबा फरीद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या कॅम्पस आणि हॉस्टेलच्या नियमांविरोधात आहे, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

२४ तासांत हॉस्टेल रिकामे करण्याचे आदेश

या विद्यार्थ्यांना आपल्या सामानासह २४ तासांत हॉस्टेल रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. कुमार कार्तिकेय ओझा, आयुष कुमार तिवारी, उज्ज्वल पांडे आणि आयुष कुमार जैस्वाल अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्वजण पदवीच्या पहिल्या आणि शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल जयंती; PM मोदी, शहांनी वाहिली आदरांजली, शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून सोशल मीडियावर यूजर्सनी प्रश्न उपस्थित केले आहेत. बाबा फरीद इन्स्टिट्यूटमधील ४ बिहारी विद्यार्थ्यांच्या छळावर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहावे, असे सागर पांडे नावाच्या युजरने म्हटले आहे. देशविरोधी कारवायांचे समर्थन केल्याबद्दल या संस्थेची मान्यता तात्काळ काढून टाकावी लागेल. तसेच हॉस्टेलचा आदेश अन्यायकारक असल्याचे काही युजर्सनी म्हटले आहे.

jawan martyred : जम्मू-काश्मीर: LOC जवळ भूसुरुंग स्फोटात २ जवान शहीद, तीन जखमीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: