jawan martyred : जम्मू-काश्मीर: LOC जवळ भूसुरुंग स्फोटात २ जवान शहीद, तीन जखमी


श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ( LoC) झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात दोन जवान शहीद झाले आणि तीन जण जखमी झाले. नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग पेरलेल्या ( army officer and a soldier lost their lives ) भागात गस्त घालत असताना लष्कराचे जवान आत शिरले. भूसुरुंगावर पाय पडल्याने स्फोट झाला. ज्यामध्ये एक अधिकारी आणि एक जवान असे दोन जण शहीद झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. माहिती मिळताच इतर जवान घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन जवान शहीद झाले असून तर तीन जण जखमी झाले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

नौशेरा सेक्टरमधील परिसरात गस्त घालत असताना भूसुरुंगाचा स्फोट झाला. ज्यामध्ये दोन लष्कराचे जवान गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर जवानांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असं जम्मू क्षेत्राच्या संरक्षण प्रवक्त्याने सांगितले. ही घटना शनिवारी घडली.
लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत बहादूर हे अतिशय शूर आणि मेहनती होते. त्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. या दोन्ही शूर जवानांच्या सर्वोच्च बलिदानासाठी देश आणि भारतीय लष्कर सदैव ऋणी राहील. लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसरायचे रहिवासी होते. तर शिपाई मनजीत सिंग सिरवेवाला हे पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी होते, असं प्रवक्त्याने सांगितले.

Agni-5 missile : अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, ५ हजार किलोमीटरपर्यंत हल्ल्याची उच्च क्षमता

काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह नऊ जवान शहीद झाले होते. दहशतवादी पूंछच्या जंगलात लपले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नौशेरा सेक्टरमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून लष्कराची कारवाई सुरू आहे. नौशेरा सेक्टर राजौरी जिल्ह्यांतर्गत येते. जम्मूमधील पीर पंजाल प्रदेशाचा भाग आहे. गेल्या १८ वर्षांतील या प्रदेशातील दहशतवादविरोधात ही सर्वात मोठी कारवाई आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: