एलन मस्क बनले इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा खजिना


हायलाइट्स:

  • एलन मस्क सध्या यशाच्या शिखरावर स्वार होऊन खूप वेगाने पुढे जात आहेत.
  • ते जगाच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
  • मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली असून हा एक नवा विक्रम बनला आहे.

वॉशिंग्टन : एलन मस्क सध्या यशाच्या शिखरावर स्वार होऊन खूप वेगाने पुढे जात आहेत. ते जगाच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली असून हा एक नवा विक्रम बनला आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि पोर्तुगालसारख्या देशांची अर्थव्यवस्था त्याच्या संपत्तीपेक्षा कमी आहे, यावरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावता येतो.

१ नोव्हेंबरपासून होणार महत्त्वाचे ५ बदल; तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, आज मस्क यांची एकूण संपत्ती ३०२ अब्ज डॉलर आहे. गेल्या २४ तासांत त्यांच्या संपत्तीत सुमारे १० अब्ज डॉलर म्हणजेच ७५ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २०२१ मध्ये आतापर्यंत त्याच्या संपत्तीत एकूण १३२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती १९९ अब्ज डॉलर आहे. ते एलन मस्कच्या १०३ अब्ज डॉलरने मागे आहेत.

दिवाळी नव्हे दिवाळं निघणार! यंदा सण साजरा करताना खिशाला बसणार महागाईची झळ
मुकेश अंबानी ११ व्या क्रमांकावर
भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी या यादीत ११ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९८.४ अब्ज डॉलर आहे. गेल्या २४ तासांत त्याच्या संपत्तीत ७६१ दशलक्ष डॉलरची घट झाली आहे. या यादीत गौतम अदानी १४व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती ७४.५ अब्ज डॉलर आहे. गेल्या चोवीस तासांत त्यांची संपत्ती ४.६७ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३२ हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ
एलन मस्कच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण म्हणजे अमेरिकन कार रेंटल कंपनी हर्ट्झने टेस्लाकडून १ लाख कार ऑर्डर केल्या आहेत. यामुळे त्याच्या शेअर्समध्ये १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. टेस्ला समभागांनी या आठवड्यात आतापर्यंत सुमारे २० टक्के उसळी घेतली आहे. टेस्लामध्ये मस्क यांची हिस्सेदारी २३ टक्क्यांच्या जवळपास आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: