वडिलांचा ९ वर्षीय लेकीवर अत्याचार, तर ८ महिन्यांचा मुलीला पाजली दारू


हायलाइट्स:

  • डोंबिवलीत क्रुरतेचा कळस
  • पोटच्याच मुलीवर बापाचा आत्याचार
  • आठ महिन्यांच्या मुलीला दारू पाजली

ठाणेः बाप – लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना डोंबिवलीत घडली आहे. आपल्या पोटच्या ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम बापानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. इतकंच नव्हे, तर आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला जबरदस्ती दारू पाजल्याची संतापजनक घटना घडली आहे.

डोंबिवली पश्चिममध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. पीडित ९ वर्षीय मुलगी आई-वडिलांसोबत राहते. आई कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधत आरोपी वडिलांनीच पोटच्या मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला आहे. मुलीना याबाबत कोणाला काही सांगू नये म्हणून शिवीगाळ व मारहाणदेखील केली. मात्र, घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. याचा विरोध करणाऱ्या आईलाही तो मारहाण करायचा.

वाचाः ‘पाकिस्तानात जाऊन राहीन पण लस घेणार नाही’; सोलापुरातील व्हिडिओ व्हायरल

त्यानंतरही बापाने आठ महिन्यांच्या मुलीला दारू पाजणे, पत्नीला मारहाण करणे असे प्रकार सुरुच ठेवले, अखेर त्याचा रोजच्या त्रासाला वैतागून पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपीला तात्काळ अटक केली आहे. शनिवारी आरोपीस कोर्टात हजर केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाचाः आर्यन खानची सुटका, पण मुनमुन धामेचा अडकली नियमांच्या फेऱ्यातSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: