पराभवानंतर देखील भारतीय संघात बदल होणार नाहीत; न्यूझीलंडविरुद्ध हा असेल फॉर्म्युला


दुबई: भारतीय संघाला टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे उपांत्य फेरीच्या दृष्टीने भारतासाठी ३१ ऑक्टोबरला होणारी न्यूझीलंडविरुद्धची लढत महत्त्वाची आहे. मात्र, तरीही पहिल्या लढतीतील संघच कायम ठेवण्यावर कर्णधार विराट कोहलीचा भर असेल.

वाचा- दिग्गज खेळाडूकडून झाली मोठी चूक; १ चेंडूवर दिल्या १० धावा

महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचा मार्गदर्शक आहे. आयपीएलमध्ये चेन्नई संघाचा फॉर्म्युलाच धोनी कायम ठेवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्ध शार्दूल ठाकूर, राहुल चहर, आर. अश्विन, ईशान किशन यांना बाहेरच बसावे लागेल. अर्थात, या दोन दिवसांत एखाद्या खेळाडूला दुखापत झाली, तरच संघात बदल होण्याची शक्यता आहे. शार्दूल ठाकूरला हार्दिक पंड्याच्या जागी अंतिम अकरामध्ये संधी मिळेल, अशी चर्चा सुरुवातीला रंगली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून हार्दिकने गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत तो किमान दोन षटके तरी टाकण्याची शक्यता आहे. यानंतर भुवनेश्वरकुमारच्या जागी शार्दूलला संधी मिळेल, असेही म्हटले जात होते.

वाचा- Video : अफगाणिस्तानने पाकिस्तानचा जवळ जवळ पराभव केला होता, पण…

रोहित, लोकेश राहुल, कोहली, सूर्यकुमार, पंत, पंड्या, जाडेजा आणि नंतर शार्दूल अशी मोठी फलंदाजीची फळी तयार होईल. मात्र, गोलंदाजीत भुवी हा शार्दूलपेक्षा उजवा ठरतो. त्याचे गोलंदाजीतील वैविध्य न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश राखण्यासाठी फायद्याचे ठरेल. त्याचबरोबर भुवीही फलंदाजीत योगदान देऊ शकतो. त्यामुळे हा बदलही शक्य नसल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. वरुण चक्रवर्ती हा पूर्णपणे तंदुरुस्त असून, त्याला आणखी एका सामन्यात निश्चित संधी मिळेल. त्यामुळे त्याच्या जागी आर. अश्विनला स्थान मिळण्याचीही शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात, संघव्यवस्थापन, प्रशिक्षक रवी शास्त्री, मार्गदर्शक धोनी, कर्णधार कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल.

वाचा- धावा करता येत नाही म्हणून कर्णधाराने मैदान सोडले; पाहा टी-२० वर्ल्डकपमधील प्रकार



Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: