आता कायदाच काय ते बोलेल; नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया


हायलाइट्स:

  • नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे वाद
  • मलिकांचे वानखेडेंवर पुन्हा आरोप
  • समीर वानखेडेंनी दिले प्रत्युत्तर

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी आजही पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्यावर आरोप केले आहेत. कोर्डेलिया क्रुजवरील पार्टीचं आयोजन करणाऱ्या काशिफ खानला वानखेडेंनी अटक केली नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांवर समीर वानखेडेंनी उत्तर दिलं आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत आणखी काही गौप्यस्फोट केले आहेत. काशिफ खान कोण आहे? याबाबत नवाब मलिकांनी खळबळजनक खुलासा केला आहे. मी एका दाढीवाल्याचं नाव घेतलं होतं. या दाढीवाल्याचं नाव काशिफ खान असं आहे. तो त्या पार्टीत होता. फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. तो सेक्स रॅकेट चालवतो. तो समीर वानखेडेंचा मित्रं आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांवर समीर वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

वाचाः होय! मी भंगारवाला आहे, पण…; नवाब मलिक यांचं भाजपला सडेतोड उत्तरनवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत समीर वानखेडे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी केवळ दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. हे आरोप धादांत खोटे आहेत. मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आता कायदाच त्यावर योग्य ती कारवाई करेल, असं समीर वानखेडेंनी म्हटलं आहे.

वाचाः बाळासाहेब ठाकरे आज नसले तरी…; राऊतांचे क्रांती रेडकरला उत्तरSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram