प्रशांत किशोर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेसला संशय; TMC ने हात झटकले


पणजी/ कोलकाता: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे सध्या आगामी गोवा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसकरता काम करत आहेत. भाजप पुढील अनेक दशकं भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील आणि हटणार नाही, असं भाकीत प्रशांत किशोर यांनी केलंय. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. जनता लवकरच भाजपला सत्तेतून उखडून फेकेल, असं राहुल गांधींना वटतंय. पण असं होणार नाही, असं म्हणत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. आता प्रशांत किशोर यांच्या या दाव्यावर तृणमूल काँग्रेसने सावध प्रतिक्रिया दिली आहे.

प्रशांत किशोर हे पक्षाचे सदस्य किंवा नेते नाहीत. त्यांनी जे काही वक्तव्य केले आहे, त्यांचे वैयक्तीक मत आहे, असं तृणमूल काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला चांगले सल्ले दिली. पण ते पक्षाचे सदस्य नाहीत. आणि त्याचं आताचं वक्तव्य हे वैयक्तीक आहे. तृणमूल काँग्रेसच पक्षाची ही भूमिका नाही, असं टीएमसीचे खासदार आणि प्रवक्ते सौगत राय म्हणाले.

काँग्रेसचा संताप आणि संशय

प्रशांत किशोर यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस संतापली आहे. लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला (TMC) मदत केली आहे. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत किशोर यांनी भाजपची साथ दिली आहे, असं चौधरी म्हणाले.

प्रशांत किशोर यांचे काँग्रेसबाबत मोठे वक्तव्य, भाजपने दिली प्रतिक्रिया

प्रशांत किशोर यांचं हे वक्तव्य कुठल्याही तरी कटाचे संकेत देत आहे किंवा टीएमसी आणि भाजपने गुपचूप हात मिळवणी केली असावी, अशी शक्यता निर्माण होते. काँग्रेसला विरोध करून टीएमसी भाजपला साथ तर देत नाहीए ना? यामुळे टीएमसेने स्पष्टीकरण द्यावं, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले. अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत.

prashant kishor : पुढील अनेक दशकं भाजपच सत्तेत राहणार! प्रशांत किशोर यांच्या दाव्यात किती दम? वाचा…

गोवा काँग्रेसचे प्रेदशाध्यक्षांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या महिन्याभरापासून तृणमूल काँग्रेसचे नेते इथे बस्थान मांडून आहेत. टीएमसीच्या गोव्यात येण्यामागे अमित शहा आणि ईडी आहे. आता प्रशांत किशोर यांच्या वक्तव्याने आपल्याला या दाव्याला दुजोरा मिळाला आहे. तृणमूल काँग्रेस गोव्यात मतं फोडण्यासाठी आली आहे. प्रशांत किशोर यांच्या वक्तव्यामुळे टीएमसीचा अजेंडा उघड झाला आहे, असं गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: