पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… आर्यन खानच्या जामिनावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया


हायलाइट्स:

  • आर्यन खानच्या जामिनावर नवाब मलिक यांची सूचक प्रतिक्रिया
  • क्रूझवरील कारवाई बनावटच, न्यायालयात जाणार – मलिक
  • समीर वानखेडे यांच्यावरही उठवली टीकेची झोड

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरण (Aryan Khan Drug Case) बोगस असल्याचा सुरुवातीपासूनच दावा करणारे व एनसीबीचे संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात आघाडी उघडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. वानखेडे यांच्या विरोधात लढाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मलिक यांनी या ट्वीटच्या माध्यमातून दिले आहेत.

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… असं ट्वीट मलिक यांनी आर्यन खानच्या जामिनाचा निर्णय आल्यानंतर केलं आहे. त्याशिवाय, व्हिडिओच्या माध्यमातूनही त्यांनी प्रतिक्रिया दिली असून समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात माननीय न्यायालयानं आर्यन खानसह तिघांना आज जामीन दिला. याआधी दोन व्यक्तींना एनडीपीएस कोर्टानं जामीन मंजूर केला होता. ज्या प्रकारे बनावट प्रकरण उभं केलं गेलं, ते पाहता खरंतर आर्यन खानलाही एस्प्लेनेड कोर्टात जामीन मिळाला असता. पण एनसीबी सतत भूमिका बदलत राहिली. लोकांच्या मनात भीती कशी निर्माण होईल, त्यांना जास्तीत जास्त दिवस तुरुंगात कसं ठेवता येईल, असा प्रयत्न एनसीबीकडून केला जातो. हे प्रकरणही बनावट होतं. आम्ही न्यायालयात जाऊ. आमच्याकडे जे पुरावे आहेत, ते सादर करू. त्यानंतर हे प्रकरणच निकाली निघेल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

तुरुंगात टाकणारा आता तुरुंगात जायला घाबरतोय!

‘ज्या समीर वानखेडे यांनी क्रूझ प्रकरणात या मुलांना तुरुंगात टाकलं, तेच आता घाबरले आहेत. या प्रकरणाची चौकशी सध्या महाराष्ट्र पोलीस करत आहे. ती सीबीआयकडे किंवा एनआयएकडं द्यावी, अशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती. हायकोर्टानं त्यांना अटकेपासून संरक्षण देऊन ही याचिका निकाली काढली. अटक करण्याआधी त्यांना ७२ तासांची नोटीस दिली जाईल, असं मुंबई पोलिसांनी कोर्टात स्पष्ट केलंय. लोकांना तुरुंगात टाकणारे आता स्वत: तुरुंगात जाण्यापासून घाबरत आहेत. जो बोगस कारभार ह्यांनी केलाय, तो हळूहळू समोर येऊ लागलाय. काही दिवसांपूर्वी याच समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांंकडं संरक्षणाची मागणी केली होती, आता त्याच पोलिसांची भीती वानखेडेंना वाटतेय. जे कारनामे त्यांनी केलेत, त्याचीच भीती त्यांना सतावत आहे, असा हल्ला मलिक यांनी चढवला.

हेही वाचा:

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं, इतिहास काढला तर… आव्हाड यांचा इशारा

गुंता वाढला! समीर वानखेडे यांचे पहिले सासरे प्रथमच मीडियासमोर

‘किरण गोसावी कात्रजमधील एका लॉजमध्ये होता, ‘या’ नावानं राहत होता’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: