cm uddhav thackeray: मुख्यमंत्री म्हणाले,’इंधन दरवाढ ही आपल्या भल्यासाठीच, खरं की खोटं?’


हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचे लोकार्पण.
  • मुख्यमंत्र्यांनी केले सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या समस्येवर भाष्य.
  • यावेळी मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारवर उपहासात्मक टीका.

मुंबई:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचे लोकार्पण केले. या वेळी त्यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारला (Modi Govt) उपहासात्मक शैलीत टोले हाणले. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरत असून खासगी वाहनांची संख्या कमी झाली तरच तो वाढेल असा मुद्दा मुख्मंत्र्यांनी मांडला. हे आता केंद्र सरकारच्या देखील लक्षात आलेले आहे. म्हणूनच तो वाढावा याचसाठी केंद्र सरकारने इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक वाहतुक समस्येवर बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. (cm uddhav thackeray criticizes union govt over petrol and diesel price hike)

आपण टीका करतो की पेट्रोलचे इतके दर वाढले, डिझेलचे इतके दर वाढले. खरं म्हणजे हे तसं नाही आहे. हे आपल्या भल्यासाठी होतंय. मी काहीही बोललो तरी तुम्हाला वाटतं की मी उपहासात्मक किंवा टीकात्मक बोलतोय. पण हे खरं आहे की खोटं, ते तुम्ही सांगा. परवडेनासं झालं तर लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरतील की नाही? म्हणून तर देशात एका चांगल्या हेतूने इंधन दरवाढ होत आहे. पण हे आपण लक्षातच घेत नाही, असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा- समीर वानखेडेंची अडचण वाढणार? नवाब मलिक यांचा वानखेडेंवर मोठा आरोप

उपस्थितांना संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपहासात्मक बोलत अनेक चिमटे काढले. मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत त्यावेळी ट्राम्स चालत होत्या. पुण्यात घोडागाड्या होत्या. त्यातून फिरणे ही एक गंमत असायची. मी लोकल आणि बेस्ट बसेसमधूनही प्रवास केलेला आहे. बाहेरच्या देशात ज्या सुविधा अनेक वर्षांपासून आहेत त्या आपण आता आणत आहोत, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी मिश्लिक शैलीत मुंबईतली सार्वजनिक वाहतुकीची परिस्थिती स्पष्ट केली.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला अखेर जामीन; मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा

‘मुंबईतली ही सेवा जगात कुठेच नाही’

मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याकडे ऑटोमॅटिक लोकल सेवा आधीच होती. ती जगात कुणाकडेही नाही. ऑटोमॅटिक लोकल सेवा म्हणजे प्रवासी रेल्वे स्थानकात उभा राहिल्यानंतर तो आपोआपच लोकलमध्ये ढकलला जातो आणि बाहेरही आपोआप फेकला जातो. ही सेवा जगात कुठेच नाही. आपली सेवा ऑटो झाली आहे. हा बाहेरच्या लोकांसाठी अभ्यासाचा विषय आहे.

क्लिक करा आणि वाचा- समीर वानखेडे हिंदू असते तर माझ्या मुलीशी त्यांचं लग्न झालंच नसतं – झाहिद कुरेशीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: