अजबच! गाईने दिला दोन डोकी असणाऱ्या वासराला जन्म


मॉस्को: रशियात एका गाईने विचित्र वासराला जन्म दिला आहे. या वासराची जगभरात चर्चा सुरू आहे. या वासराला दोन डोकी असून त्याचे शरीर डुक्कराच्या आकारात आहे. रशियातील खाकस्सिया भागातील मटकेचिक गावात ही घटना घडली. एका शेतकऱ्याकडे असलेल्या गाईने या वासराला जन्म दिला. मात्र, दुर्देवाने जन्मानंतर काही वेळेतच वासराचा मृत्यू झाला. तर, काही दिवसांनी गाईनेही प्राण सोडले.

खाकस्सियातील कृषी आणि खाद्यान मंत्रालयाच्या पशू विभागाने या घटनेला दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाईचा हा पहिलाच वासरू होता. अशाप्रकारच्या वासराच्या जन्मासाठी जीनोममध्ये होत असलेला बदल जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. पशूंमधील म्युटेशनसाठी त्यांच्या अंतर्गत आणि बाहेरील परिस्थिती जबाबदार असते.

राजस्थानमध्येही दोन तोंडे असलेल्या वासराचा जन्म

अशा प्रकारचे म्युटेशन क्रॉसब्रीडिंग दरम्यान होऊ शकते. मागील महिन्यात राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात सिकरौदा गावात दोन तोंड असलेला वासराचा जन्म झाला होता. त्याला दोन मान, दोन तोंड, चार डोळे, चार कान होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: