शेअर बाजारात दिवाळी सेल! सेन्सेक्स ६०० अंकांनी गडगडला, दीड लाख कोटींचा चुराडा


हायलाइट्स:

  • गुंतवणूकदारांनी आज पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे.
  • चौफेर विक्रीने सेन्सेक्स ६०० अंकांनी गडगडला असून निफ्टीत २०० अंकांची पडझड झाली.
  • यामुळे दीड लाख कोटींचे नुकसान झाले.

मुंबई : आयपीओ योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हाती मुबलक रोकड असावी, यासाठी गुंतवणूकदारांनी आज गुरुवारी भांडवली बाजारात जोरदार विक्री केली आहे. या चौफेर विक्रीने सेन्सेक्स ६०० अंकांनी गडगडला असून निफ्टीत २०० अंकांची पडझड झाली. यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास दीड लाख कोटींचा फटका बसला आहे. तर दिवाळीच्या तोंडावर ब्लुचिप शेअरच्या किंमती कमी झाल्याने खरेदीची संधी देखील असल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे.

सरकारची योजना; रेशन दुकानांवर मिळेल एलपीजी सिलिंडर, होईल असा फायदा
आज सकाळपासून बाजारावर विक्रीचा दबाव दिसून आला. आज नायकाचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. तर पेटीएमने मागील १० वर्षांतील सर्वात मोठ्या आयपीओची घोषणा केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आयपीओवर लक्ष केंद्रीत केलं असल्याचे शेअर दलालांनी सांगितले. नायका आणि पेटीएम या दोन्ही आयपीओचे मूल्य २४००० कोटी आहे. मागील काही महिन्यात आयपीओने चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे साहजिकच या दोन्ही इश्युकडे गुंतवणूकदार मोठ्या संख्येने आकर्षित होतील, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी व्यक्त केले.

बँक ऑफ बडोदा घोटाळा : सीबीआयने ६ जणांना केली अटक
आजच्या सत्रात बँका आणि धातू क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आयसीटीसी, रिलायन्स, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, ऍक्सिस बँक, टायटन, एसबीआय , एचआयएल, टाटा केमिकल, अदानी एन्टरप्राईस, पीएनबी बँक हे शेअर घसरले. मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, आयआरसीटीसी, इंडसइंड बँक, एल अँड टी या शेअरमध्ये वाढ झाली.

प्रतीक्षा संपली! दशकातील सर्वात मोठ्या IPO ची थोड्याच वेळात घोषणा होणार
आज आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण दिसून आली. दरम्यान आज वायदेपूर्ती असल्याने देखील बाजारात संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठी विक्री करून पोर्टफोलिओ संतुलित केल्याचे बोलले जाते. सध्या सेन्सेक्स ६३९ अंकांनी घसरला असून तो ६०५०३ अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २०३ अंकांच्या घसरणीसह १८००७ अंकावर आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: