सुजय विखेंना चांगला जावई मिळेल; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळं चर्चेला उधाण


हायलाइट्स:

  • चंद्रकांत पाटील यांनी केलं सुजय विखेंचं कौतुक
  • सुजय विखेंना चांगला जावई मिळेल – पाटील
  • चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळं उंचावल्या भुवया

अहमदनगर: एकीकडे विविध पक्षातील नेत्यांना अडचणीत आणणाऱ्या जावयांची चर्चा सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे मिश्कील टिप्पणी केली आहे. ज्येष्ठांची चांगली सेवा करीत असल्याने भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना चांगला जावई मिळेल, असे पाटील म्हणाले. विखे पाटील यांच्याकडून केंद्र सरकारची वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. त्याद्वारे ज्येष्ठांना सहाय्यभूत ठरणारी साधने वाटली जात आहेत. त्या केंद्राला पाटील यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. (Chandrakant Patil Praises Sujay Vikhe Patil)

वाचा: अजित पवारांना आणखी एक धक्का! मावसभावाच्या घरी ईडीची धाड

बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रवरा अभिमत विद्यापीठात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी पाटीलही आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी विखे पाटील यांच्यासोबत शिर्डी मतदारसंघातील या उपक्रमाची पाहणी केली. त्यावेळी त्यांचे कौतुकही केले. केंद्र सरकारच्या या योजनेत साठ वर्षांवरील ज्येष्ठ नारिकांना आरोग्यासाठी उपयुक्त विविध साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. या केंद्रावर नागरिकांशी संवाद साधताना पाटील यांनी विखे पाटलांचे कौतुक केले. ते म्हणाले, डॉ. विखे पाटील ज्येष्ठांना आधार देणारे हे पुण्याचे काम करीत आहेत. आई-वडिलांसमान असलेल्या या नागरिकांपर्यंत ते केंद्र सरकारची योजना पोहचवत आहेत. त्यांचे नियोजनही कौतुकास्पद आहे. यातून त्यांना नक्की पुण्य मिळेल आणि त्यांना चांगला जावई मिळेल, असेही पाटील म्हणाले.

वाचा: बेड्या पडताच किरण गोसावी म्हणाला, ‘मी मराठी माणूस; कोणीतरी माझ्या…’

पाटील यांच्या मिश्किल टिपणीवर उपस्थितांमध्ये हशा पिकला. डॉ. सुजय विखे यांना अनिशा नावाची मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वी विखे कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यावेळी अनिशा त्यांच्यासोबत होती. तिने पंतप्रधानांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांना प्रश्नही विचारले. मोदी यांनी तिला खाऊ देत तिचे कौतुक केले होते. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांच्या या नातीची चांगलीच चर्चा झाली होती.
सध्या राज्यात विविध पक्षांच्या नेत्यांचे जावई चर्चेत आहेत. विविध प्रकरणांशी संबंधांने त्याची चर्चा आहे. जावयांमुळे नेते अडचणीत आल्याचीही काहींच्या बाबतीत चर्चा आहे. अशा परिस्थितीत पाटील यांनी विखे यांच्या भावी जावयाबद्दल केलेल्या या मिश्किल टिपणीला उपस्थितांनी हसून दाद दिली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: