बेड्या पडताच किरण गोसावी म्हणाला, ‘मी मराठी माणूस; कोणीतरी माझ्या…’


पुणे: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumbai Drug Case) प्रकरणात पैशाची देवाणघेवाण झाल्याचे आरोप झाल्यापासून फरार असलेला या प्रकरणातील पंच किरण गोसावी (Kiran Gosavi) याला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या कारवाईच्या आधीचा किरण गोसावीचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यातून त्यानं प्रभाकर साईल याच्यावरच पैसे घेतल्याचे आरोप केले आहेत. तसंच, राज्यातील राजकीय नेत्यांना मदतीची साद घातलीय.

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणात किरण गोसावी व त्याचा बॉडीगार्ड असलेला प्रभाकर साईल हे पंच आहेत. हे प्रकरण बनावट असून बॉलिवूडमधून खंडणी उकळण्यासाठी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी उभं केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्यानंतर प्रभाकर साईल यानं एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडून खंडणी मागितल्याचा आरोप त्यानं केला होता. हे पैसे वानखेडे यांच्यासह सर्वांना मिळाल्याचा दावा त्यानं केला होता. साईलचा हा व्हिडिओ समोर आल्यापासून किरण गोसावी फरार होता. तो लखनऊमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी आज धडक कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं.

वाचा: फरार किरण गोसावी अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; अटकेची कारवाई होणार?

गोसावीला ताब्यात घेण्यापूर्वीचा त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं प्रभाकर साईलनं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘साईल हा खोटं बोलत आहे. प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन भावांना या प्रकरणात पैसे मिळाले आहेत. पोलिसांनी त्यांचे सीडीआर तपासावेत. त्याला कोणाच्या आणि काय ऑफर आल्या होत्या हे समोर येईल. माझेही फोन रेकॉर्ड तपासावेत. क्रूझवरील कारवाईनंतर पैशाच्या देवाणघेवाणीबाबत माझं त्याच्याशी कधीच बोलणं झालेलं नाही. त्याच्याशी माझं झालेलं संभाषण आधीचं आहे. माझा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्या संदर्भात मी त्याच्याशी याआधी बोललो आहे. आर्यन खान प्रकरणी माझं त्याच्याशी अजिबात बोलणं झालेलं नाही,’ असं गोसावी यानं म्हटलं आहे.

‘मी एक मराठी माणूस आहे. राज्यातील विरोधी पक्षानं किंवा सत्ताधारी पक्षातील कोणीतरी माझ्या मागे उभं राहायला हवं. मी केलेल्या मागण्यांची चौकशी व्हावी, यासाठी पोलिसांकडं पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा त्यानं व्यक्त केली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: