म्युच्युअल फंड गुंतवणूक; पोर्टफोलिओमध्ये मल्टी असेट फंड का असावा? जाणून घ्या सविस्तर


हायलाइट्स:

  • मालमत्ता वर्गीकरण (asset allocation) हा गुंतवणुकीच्या दृष्टीने एक महत्वाचा पैलू आहे.
  • सेबीनुसार मल्टी असेट फंडांनी किमान १० टक्के निधी हा तीन किंवा त्याहून अधिक मालमत्तांमध्ये गुंतवावा.
  • पोर्टफोलिओतील एक चतुर्थांश वाटा हा मल्टी असेट फंडांमध्ये गुंतवायला हवा

सलील अनंत पत्की, मुंबई :मल्टी असेट फंड हे नावच असे सुचवते की या म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणूक ही एकापेक्षा अधिक मालमत्तांमध्ये केली जाते. याचा असा अर्थ होतो की या योजनांमध्ये गुंतवणूकदाराचा पैसा हा एकाच मालमत्ता श्रेणीमध्ये केंद्रीत राहत नाही. जसे की इक्विटी , डेट, सोनं इ. त्याऐवजी एक सुनियोजत मालमत्ता वाटप रणनीतीद्वारे मल्टी असेट फंड्स तुम्हाला मालमत्तेतील वैविध्यता देतात परिणामी पोर्टफोलिओतील जोखीम काढली जाते.

तेजीला ब्रेक ; नफेखोरांनी साधली संधी, सेन्सेक्स -निफ्टीची घसरगुंडी
इथं एक आवर्जून नमूद करायला हवं की मालमत्ता वर्गीकरण (asset allocation) हा गुंतवणुकीच्या दृष्टीने एक महत्वाचा पैलू आहे. ज्याचा गुंतवणूकदाराने बाजारातील वेगवेगळ्या परिस्थितीत लाभ घेतला पाहिजे. विविध मालमत्तांमध्ये योग्य प्रकारे निधी वाटप झाल्यास तुमची जोखीम कमी होते आणि महागाईच्या तुलनेत चांगला परतावा मिळण्यास फायदा होतो.

सणासुदीत महागाई ‘रंग’ दाखवणार; या कंपन्यांनी दिले दरवाढ संकेत, होणार असा परिणाम
सेबीच्या श्रेणीनिहाय व्याख्येनुसार मल्टी असेट फंडांनी किमान १० टक्के निधी हा तीन किंवा त्याहून अधिक मालमत्तांमध्ये गुंतवायला हवा. मात्र बाजाराच्या परिस्थितीनुसार आणि इतर अनेक घटकांनुसार मल्टी असेट फंड त्यांच्या रणनितीनुसार चांगला परतावा मिळण्यासाठी निधी वाटप करू शकतात. सर्वसाधारणपणे अशा फंडामध्ये इक्विटीमधील गुंतवणूक प्रमाण हे १० टक्के ते ८० टक्क्यांच्या दरम्यान बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असते.

सोने-चांदीमधील तेजी कायम ; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने
साधारण बाजार स्थितीत मल्टी असेट फंड हे इक्विटीमध्ये किमान ६५ टक्के निधी गुंतवतात. तर डेट ,सोनं आणि रिट्स इन्व्हिटस या मालमत्ता श्रेणीत १० ते ३५ टक्के, १० ते ३०टक्के आणि ० ते १० टक्के गुंतवणूक प्रमाण असते. निधी वाटपात असलेल्या लवचिकतेमुळे मल्टी असेट फंड्स हे प्राधान्याने गुंतवणूकदाराच्या पार्टफोलिओमध्ये असायला हवेत. तस पाहता पोर्टफोलिओतील एक चतुर्थांश वाटा हा मल्टी असेट फंडांमध्ये गुंतवायला हवा जो तुम्हाला तुमची गुंतवणूक बाजाराच्या कोणत्याही परिस्थितीत सहज पुढे नेईल आणि संपत्ती वाढण्यास मदत करेल.

तुमच्या पोर्टफोलिओत मल्टी असेट फंड का असावा याची महत्वाची कारणे
– मालमत्तेत वैविध्यता
– कमी जोखीम आणि स्थिर परतावा
– इक्विटीच्या सर्व कॅप्समध्ये लवचिक निधी वाटप
– वैविध्यपूर्ण डेट पोर्टफोलिओ
– महागाईपासून बचाव

घर खरेदीची सुवर्णसंधी; ‘या’ सरकारी बँंकेने गृहकर्ज केले स्वस्त, या दराने मिळेल कर्ज
या श्रेणीत अनेक गुंतवणूक योजना बाजारात आहेत, मात्र एक फंड सातत्याने सकारात्मक गुंतवणूक अनुभव देत आहे तो म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल मल्टी असेट फंड. या योजनेने विरोधाभासी निर्णय घेतल्याने अल्प कालावधीत योजनेची कामगिरी तुलनेने सामान्य राहिली. मात्र दीर्घ कालावधीत या योजनेतून सातत्यपूर्ण परतावा मिळेल अशी अपेक्षा आहे. आकडेवारीचा विचार केला तर ५ वर्ष आणि १० वर्षात या योजनेने कधीच नकारात्मक परतावा दिला नाही. मागील एका वर्षात या योजनेने तब्बल ६० टक्के परतावा दिला तर याच कालावधीत बेंचमार्कने ३७.६ टक्के परतावा दिला.
(लेखक श्री फायनान्स या वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपनीचे संचालक आहेत. लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत)Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: