rahul gandhi : ‘पेगाससला मंजुरी PM मोदींनी दिली की गृहमंत्री शहांनी?’, राहुल गांधींचा बोचरा सवाल


नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी माध्यमांशी संवाद साधला. पेगासस हेरगिरी प्रकरणावरून ( pegasus snooping ) राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरलं. आपल्याला याबाबत फक्त ३ प्रश्न विचारायचे आहेत. हे प्रश्न आपण आधीही विचारले होते आणि भविष्यातही विचारत राहू. या प्रकरणात सरकारच्या हेतूवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

संसदेच्या गेल्या अधिवेशनात आम्ही पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने आपल्या भूमिकेचं समर्थनच केलं आहे. पेगाससला कोणी अधिकृत केलं? त्याचा वापर कोणाच्या विरोधात झाला? इतर कोणत्या देशाला आपल्या नागरिकांची माहिती उपलब्ध होतेय का?, असे तीन प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले.

पेगासस हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणीाची चौकशी होणार आहे. हे मोठं पाऊल आहे. यातून सत्य बाहेर येईल, असा विश्वास राहुल गांधी व्यक्त केला. आम्ही हा मुद्दा पुन्हा संसदेत मांडू. संसदेत चर्चा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. यावर चर्चा करणं भाजपला पटणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

pegasus snooping row : पेगासस हेरगिरी प्रकरणी केंद्राला झटका; सुप्रीम कोर्टाने नेमली चौकशी समिती, कोण आहेत समितीत?

पेगाससचा उपयोग हा मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, भाजप मंत्री आणि इतरांविरोधात केला गेला. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे पेगासस वापरून डेटा मिळवत होते का? निवडणूक आयोग, सीईसी आणि विरोधी पक्षनेत्यांच्या फोन टॅपिंगचा डेटा पंतप्रधानांकडे जात असेल तर ते गुन्हेगारी कृत्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

nawab malik : ‘नवाब मलिकांसह महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर दाऊद इब्राहिमचा प्रभाव’, भाजप

‘आम्ही पेगाससचा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता. पेगासस हा देशावर, देशाच्या संस्थांवर हल्ला आहे. आम्ही ३ प्रश्न विचारले. पेगासस कोणी विकत घेतला, कोणताही खासगी पक्ष तो विकत घेऊ शकत नाही, फक्त सरकार ते खरेदी करू शकते. ते कोणावर वापरले गेले? पेगाससचा डेटा इतर कोणत्या देशाकडे होता की तो फक्त भारत सरकारकडे होता? यापैकी एकाही प्रश्नाचं आम्हाला उत्तर मिळालं नाही. विरोधक एकजुटीने उभे राहिले. हा देशाच्या लोकशाहीवरचा हल्ला आहे, असा आरोप राहुल गांधी म्हणाले.

पेगासस प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी. पेगासससाठी पंतप्रधानांनी आदेश दिला होता किंवा गृहमंत्र्यांनी? आपल्याच देशावर इतर देशाशी संगनमत करून पंतप्रधानांनी आपल्या देशावर हल्ला केला आहे. हे आम्हाला पंतप्रधानांकडून ऐकायचं आहे, असाही आरोप राहुल गांधींनी केला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: