सोने-चांदीमधील तेजी कायम ; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने


हायलाइट्स:

  • आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली.
  • आज सोने जवळपास १५० रुपयांनी महाग झाले.
  • चांदीमध्ये ३७० रुपयांची वाढ झाली.

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीची मागणी कायम आहे. आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. आज सोने जवळपास १५० रुपयांनी महाग झाले. तर चांदीमध्ये ३७० रुपयांची वाढ झाली.

पैसे कमविण्याची संधी; आठवडाभरात दोन आयपीओ खुले होणार, कोणते ते जाणून घ्या
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७९६७ रुपये इतका वाढला आहे. त्यात १५४ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोने ४८९७५ रुपयांपर्यंत वाढले होते. आज एक किलो चांदीचा भाव ६५३६७ रुपये असून त्यात ३७८ रुपयांची वाढ झाली आहे.

तेजीला ब्रेक ; नफेखोरांनी साधली संधी, सेन्सेक्स -निफ्टीची घसरगुंडी
दरम्यान, आज सराफा बाजारात मात्र सोने दरात घसरण दिसून आली. Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१३० रुपये झाला. २४ कॅरेटचा भाव ४८१३० रुपये इतका होता. त्यात १४० रुपयांची घसरण झाली. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६९०० रुपये झाला. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५११६० रुपये इतका झाला. त्यात मंगळवारच्या तुलनेत ३३० रुपयांची घसरण झाली.

घर खरेदीची सुवर्णसंधी; ‘या’ सरकारी बँंकेने गृहकर्ज केले स्वस्त, या दराने मिळेल कर्ज
आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५०८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१८० रुपये इतका खाली आला आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत ३३० रुपयांची घट झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७४०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०१०० रुपये इतका आहे.

तेजीमुळे मागील दोन आठवड्यात सोनं एक हजार रुपयांनी महागले आहे. तर याच काळात चांदीचा भाव ४१५० रुपयांनी वाढला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव ४७७११ रुपये तर चांदीचा भाव ६४५७४ रुपये इतका होता. जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव ०.२ टक्क्यांनी घसरला आणि १७८८.६६ डॉलर प्रती औंस झाला. गोल्ड फ्युचर्सचा भाव १७९०.६० डॉलर इतका होता. चांदीमध्ये ०.८ टक्के घसरण झाली आणि प्रती औंस भाव २३.९५ डॉलर होता.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: